टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये Whatsapp , Instagram , Youtube , Facebook यासारखे बरेच ॲप्स यात येतात. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनीकडून वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स उपलब्ध करण्यात येत आहे. त्यातच आता मार्क झुकरबर्ग यांच्या Threads चे सुद्धा लाखो युजर्स आहेत. या यूजर्स साठी झुकरबर्ग यांनी Threads वर २ नवीन फीचर्स लाँच केले आहेत. सोशल मीडिया ट्रेंड आणि युजर्सला अप्रतिम अनुभव देण्यासाठी हे फीचर्स लाँच करण्यात आले आहेत. हे फीचर्स नेमके काय आहेत हे आज आपण जाणून घेऊयात.
काय आहे Threads
Threads हे ऑनलाइन सोशल मीडिया आणि सोशल नेटवर्किंग सर्विस आहे. ही सर्विस मेटा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चालवली जाते. हे ॲप युजर्सला कंटेंट, फोटोज, व्हिडिओ, पोस्ट शेअर करण्याची आणि रिप्लाय, रिपोस्ट आणि लाईक्सच्या माध्यमातून युजर्सच्या पोस्ट सोबत संवाद साधण्याची क्षमता प्रदान करते. हे ॲप लॉन्च झाल्यानंतर बऱ्याच युजर्सने याचा वापर केला. आता युजरच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीने यामध्ये आणखीन दोन फीचर्स ऍड केले आहेत.
प्रायव्हसी फीचर
मार्क झुकरबर्ग यांनी थ्रेडमध्ये प्रायव्हसी फीचर लॉन्च केले आहे. त्यानुसार थ्रेड युजर्स आता सुरक्षितपणे आणि प्रायव्हेटली मित्र- मैत्रिणींसोबत कुटुंबासोबत चॅटिंग करू शकतात. हे फीचर्स संवाद साधण्यासाठी एक प्रायव्हेट आणि सिक्युअर ऑप्शन प्रदान करते. कंपनीने हे फीचर ऑनलाइन प्रायव्हसी आणि डेटा सिक्युरिटीबाबत वाढत्या समस्येमुळे लॉन्च केले आहे.
सबस्क्रीप्शन प्लॅन
मार्क झुकरबर्ग यांनी लॉन्च केलेले दुसरे फीचर्स म्हणजे सबस्क्रीप्शन प्लॅन. म्हणजे थ्रेड्स वापरताना युजर्सला थ्रेड्स वरील सर्व टूल्स वापरण्यासाठी सबस्क्रीप्शन प्लॅन घ्यावा लागेल. त्यानंतर युजर्सला स्पेशल एक्सेस देण्यात येईल. यासाठी 900 रुपयांचे प्रीमियम सबस्क्रीप्शन प्लॅन कंपनीकडून लॉन्च करण्यात आला आहे. त्यानुसार 900 रुपयांमध्ये युजर्स जाहिरात मुक्त व्हिडिओज पाहू शकतील. या सबस्क्रीप्शन प्लॅनच्या माध्यमातून युजर्सला जास्त प्रीमियम आणि वैयक्तिकृत सोशल मीडिया अनुभव प्रदान होईल.