टाइम्स मराठी । इटालियन कंपनी Ducati ने भारतीय बाजारपेठेमध्ये Multistrada V4 च्या लाईनअप मध्ये नवीन बाईक ॲड केली आहे. कंपनीने Ducati Multistrada V4 Rally ही सुपर बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने ही बाईक ब्लॅक स्कीम मध्ये लॉन्च केली असून या बाईकमध्ये वेगवेगळे फीचर्स ॲड केले आहेत. त्याचबरोबर या बाईकमध्ये नवीन रायडिंग मोड देखील उपलब्ध केले आहेत. Ducati च्या या नवीन बाईकची किंमत 29.72 लाख रुपये एवढी आहे.
फिचर्स
Ducati Multistrada V4 Rally ही बाईक पूर्वीच्या व्हेरिएंट पेक्षा वेगळी असून यामध्ये 200 एम एम ट्रेवल सस्पेन्शन उपलब्ध करण्यात आले आहे. म्हणजेच बाईकच्या फ्रंट आणि रियर मध्ये दोन्ही साईडने सस्पेन्शन उपलब्ध करण्यात आले आहे. कंपनीने यामध्ये बरेच बदल केले असून यामध्ये 30 लिटरचा मोठा फ्युएल टॅंक देण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनीने नवीन डिझाईन मध्ये विंड स्क्रीन उपलब्ध केले आहे. त्यानुसार विंडस्कीन लांब आणि रुंद आहे. यासाठी कंपनीने रिवाईज्ड लगेज माउंटचा वापर केला आहे.
स्पेसिफिकेशन
Ducati Multistrada V4 Rally या नवीन बाईक मध्ये 1158 CC V4 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 168 Bhp पावर आणि 128 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत कंपनीने सहा स्पीड गिअर बॉक्स दिला आहे. Ducati कंपनीने यामध्ये नवीन ऑफ रोड पॉवर मोड सह नवीन एंड्युरो रायटिंग मोड देखील उपलब्ध केला आहे.