Acer Electric Scooter : Acer ने लाँच केली इलेक्ट्रिक स्कुटर; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । गेल्या वर्षभरापासून इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल चांगलाच वाढला आहे. त्यातच इलेक्ट्रिक गाड्यांचा लूक आकर्षक असल्याने तरुणाई या गाड्यांकडे ओढली गेली आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता अनेक कंपन्या सुद्धा आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लाँच करत आहेत. याच पार्श्वभूमीवर लॅपटॉप बनवणारी कंपनी Acer ने सुद्धा आपली पहिलीवहिली इलेक्ट्रिक स्कुटर भारतात लाँच केली आहे. Acer MUVI 125 4G असे या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव असून Acer ने eBikeGo कंपनीसोबत मिळून ही स्कुटर डेव्हलप केली आहे. आज आपण या इलेक्ट्रिक स्कुटरचे खास फीचर्स आणि तिच्या किमतीबाबत जाणून घेणार आहोत.

   

स्पेसिफिकेशन

Acer MUVI 125 4G मध्ये 48V 35.2 Ah बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी चार तासांचा वेळ लागतो. परंतु एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर Acer ची ही स्कुटर 80 किलोमीटर पर्यंत अंतर पार करू शकते. तसेच या स्कुटरचे टॉप स्पीड 75 किलोमीटर प्रति तास इतकं आहे. Acer  MUVI 125 4G या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये (Acer Electric Scooter) इलेक्ट्रिक मोटर देखील देण्यात आली आहे.

फिचर्स- Acer Electric Scooter

Acer MUVI 125 4G या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये कंपनीने इंप्रूव्ह स्टॅबिलिटी आणि हॅन्डलिंग साठी 16 इंच व्हील्स दिले आहे. त्याचबरोबर या स्कूटरच्या रियर मध्ये शॉक ओझर्बल सिस्टीम देण्यात आलं आहे. ही सिस्टीम हायड्रोलिक फोर्कसह उपलब्ध आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर पुजेरिस्टिक डिझाईन मध्ये उपलब्ध केली असून ही लाईट वेट चेसीस सह तयार करण्यात आली आहे.Acer MUVI 125 4G या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अँड्रॉइड आणि OS कनेक्शन चा वापर होऊ शकतो. त्याचबरोबर यामध्ये चार इंच LCD स्क्रीन देखील देण्यात आली आहे.  ही स्क्रीन ब्लूटूथ इनेबल असून यासोबत तीन कॉन्फिगरेशन देखील उपलब्ध करण्यात आले आहे. Acer कंपनीची ही कस्टम बिल्ड स्कूटर आहे.

किंमत किती

Acer MUVI 125 4G  या स्कूटरमध्ये कंपनीने तीन कलर ऑप्शन उपलब्ध केले आहे.  यामध्ये ब्लॅक व्हाईट आणि ग्रे हे तीन कलर उपलब्ध आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 99,999 रुपये आहे. लवकरच या इलेक्ट्रिक स्कूटरची प्री बुकिंग सुरू होणार आहे. कंपनीने ही स्कूटर (Acer Electric Scooter) सर्वसामान्य नागरिकांसाठी नाही तर फूड डिलिव्हरी, ग्रोसरी डिलिव्हरी यासाठी डेव्हलप केली आहे. म्हणजेच बिझनेस टू बिझनेस साठी या स्कूटरचा वापर केला जाऊ शकतो. झोमॅटो स्विगी यासारख्या प्लॅटफॉर्मसाठी या स्कूटरचा वापर केला जाईल.