टाइम्स मराठी । Vivo चे मोबाईल ग्राहकांना चांगलेच पसंत पडतात. भारतात या मोबाईलचे ग्राहकही जास्त आहेत. आता लवकरच Vivo भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Vivo Y200 5G असे या मोबाईलचे नाव आहे. कंपनीकडून या स्मार्टफोनच्या रिलीज डेट बद्दल आणि या मोबाईलचे डिझाईन, कलर ऑप्शनचा खुलासा करण्यात आला आहे. त्यानुसार हा स्मार्टफोन 23 ऑक्टोबरला भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.
स्पेसिफिकेशन
Vivo Y200 5G या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचचा AMOLED FHD डिस्प्ले देण्यात येणार आहे. हा डिस्प्ले 120 HZ रिफ्रेश रेटसह येतो. कंपनीने लॉन्च केलेल्या पोस्टरच्या माध्यमातून या स्मार्टफोनमध्ये रिंग LED स्मार्ट फ्लॅश मिळणार आहे. या अपकमिंग स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 प्रोसेसर देण्यात येऊ शकते. तसेच Vivo चा हा मोबाईल अँड्रॉइड तेरा वर आधारित असलेल्या FUNTOUCH OS 13 वर काम करेल.
कॅमेरा– Vivo Y200 5G
Vivo Y200 5G मध्ये 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरासह ड्युअल रियर सेटअप उपलब्ध होऊ शकतो. त्याचबरोबर यामध्ये OIS सपोर्ट असलेला 64 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल बोकेह लेन्स देण्यात येऊ शकते. Vivo कंपनीने यापूर्वी लॉन्च केलेला स्मार्टफोन vivo Y100 5G प्रमाणेच हा स्मार्टफोन असणार आहे.
रॅम आणि स्टोरेज –
Vivo Y200 5G या स्मार्टफोन मध्ये आठ जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. त्याचबरोबर यामध्ये 4800 MAH बॅटरी देखील देण्यात येणार आहे. ही बॅटरी 44 W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. या मोबाईलचे वजन 190g एवढे असणार आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन स्लिक प्रोफाइलमध्ये उपलब्ध होईल. येणाऱ्या 23 ऑक्टोबरला हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे.