टाइम्स मराठी । टू व्हीलर आणि थ्री व्हीलर वाहन निर्माता कंपनी म्हणून ओळखला जाणाऱ्या TVS मोटर्सने आपली प्रसिद्ध स्कुटर TVS Jupiter 125 स्मार्टएक्सोनेक्ट टेक्नोलॉजीसह लाँच केली आहे. तसेच कंपनीने या स्कूटरमध्ये वेगवेगळे कनेक्टेड फीचर्स उपलब्ध केले असून नवीन डिझाईनमध्ये ही स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. या स्कूटरची किंमत 96,855 रुपये एवढी आहे.
काय आहे एक्सोनेक्ट टेक्नॉलॉजी
TVS Jupiter 125 या स्कूटरमध्ये उपलब्ध करण्यात आलेली स्मार्टएक्सोनेक्ट ही एक टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून स्कूटर चालवताना रायडर कनेक्टेड आणि अपडेटेड राहावे यासाठी ही टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. यामध्ये बरेच कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. या कनेक्टिव्हिटी फीचर्सच्या माध्यमातून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, क्लायमेट कंट्रोल, गेम स्कोर, न्यूज अपडेट या सोबत आपण स्कूटर चालवताना देखील अपडेट राहू शकतो.
फीचर्स – TVS Jupiter 125
TVS Jupiter 125 च्या या अपडेटेड व्हर्जनमध्ये TFT स्क्रीन, न्यू कलर हायब्रीड कन्सोल हे रायडरच्या स्मार्टफोनला जोडण्यात येते. यामुळे कॉल किंवा मेसेज नोटिफिकेशन, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन आणि व्हॉइस हे गाडी चालवण्यापर्यंत पोहोचेल. या स्कूटरमध्ये नवीन TFT स्क्रीन देण्यात आली आहे. ही स्क्रीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि फूड किंवा शॉपिंग ॲप्सला अलर्ट जारी करते. यासोबतच रायडर नवीन स्क्रीनच्या माध्यमातून क्लायमेट अपडेट आणि रियल टाईम गेम स्कोर, न्यूज अपडेट पाहू शकतो. याशिवाय या स्कुटर मध्ये नवीन सेफ्टी फीचर्स उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये फॉलो मी हॅन्डलॅम्प, हजार्ड लाईट देखील उपलब्ध आहे. या दोन्ही फीचर्स च्या माध्यमातून इंजिन बंद झाल्यानंतर देखील लाईट मिळते . म्हणजेच इंजिन बंद झाल्यानंतर फॉलो मी फीचर हेडलॅम्पला वीस सेकंदापर्यंत लाईट चालू ठेवते.
स्पेसिफिकेशन
TVS Jupiter 125 मध्ये 124.8 सीसी इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8.04bhp पॉवर आणि 10.5 nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत सीव्हीटी ट्रान्समिशन सिस्टीम प्रदान करण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये बारा इंचाचे अलॉय व्हील्स उपलब्ध आहे. हे अलॉय व्हील्स टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मोनो शॉक सह सुसज्ज आहे. त्याचबरोबर या स्कूटरमध्ये ब्रेकिंग साठी ड्रम आणि डिस्क ब्रेक उपलब्ध करण्यात आले आहेत.