Honda ने लाँच केली आकर्षक स्पोर्ट बाईक; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । Honda कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगेवेगळ्या गाड्या घेऊन येत असते. देशभरातील ग्राहकही मोठ्या प्रमाणात होंडाच्या गाड्या खरेदी करत असतात. आताही होंडाने एक नवीन आकर्षक अशी स्पोर्ट बाईक लाँच केली असून तमाम तरुण वर्गाला या बाईकची चांगलीच भुरळ पडेल यात शंका नाही. होंडा ने OBD2A कंप्लायंट 2023 CB300R निओ स्पोर्ट्स कॅफे रोडस्टर देशात लॉन्च केली आहे. होंडा कंपनीची ही बाईक इंजीनियरिंग पावर डिझाईन आणि प्रीमियम कॉलिटीने अगदी मस्त आहे . कंपनीने ही बाईक दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केली आहे. यामध्ये पल्स स्पार्टन रेड आणि मॅट मॅसीव ग्रे मेटॅलिक या रंगाचा समावेश आहे.

   

स्पेसिफिकेशन

Honda CB300R 2023 नियो स्पोर्ट्स कॅफे रोडस्टर बाईक मध्ये 286.01 cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर BSVI OBD2A  कंप्लायंट PGM-FI इंजिन सह उपलब्ध असून 30.7 BHP पावर आणि 27.5 nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत कंपनीने सहा स्पीड गिअर बॉक्स दिले आहेत. त्याचबरोबर कंपनीने या बाईकमध्ये स्लीपर क्लर्क देखील उपलब्ध केले आहे. हे स्लीपर क्लर्च असेच गिअर शिफ्टिंग करण्यासाठी मदत करते.

डिझाईन आणि फीचर्स

ही बाईक स्टायलिश रेट्रो थीम मध्ये उपलब्ध असलेल्या CB1000R या लिटर क्लास रोडस्टर बाईक प्रमाणे डेव्हलप करण्यात आली आहे. या बाईकमध्ये मस्कुलर फ्युएल टॅंक आणि अपस्वेप्ट एक्झॉस्ट देण्यात आले आहे. यासोबतच गोल आकारामध्ये LED हेडलाईट, LED विंकस आणि LED टेल लाईट देखील उपलब्ध करण्यात आले आहे. या बाईकमध्ये कंपनीने डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर उपलब्ध केले असून आपत्कालीन स्टॉप सिग्नल आणि हजार्ड लाईट स्विच देखील उपलब्ध आहे.

सस्पेन्शन

या स्पोर्ट बाईकमध्ये कंपनीने सस्पेन्शन साठी 41MM यूएसडी फ्रंट फॉर्क्स आणि रियल व्हील वर ऍडजेस्टेबल मोनोशॉक सस्पेन्शन दिले आहे. या बाईक मध्ये ब्रेकिंग साठी ड्युअल चॅनल ABS सह 296MM फ्रंट डिस्क ब्रेक आणि 220 MM रियर डिस्क ब्रेक उपलब्ध करण्यात आला आहे. या बाईकचे वजन 146 किलोग्रॅम एवढे असून ही या सेगमेंट मधील सर्वात हलकी बाईक आहे.