टाइम्स मराठी । फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून ऑनलाइन सोबतच ऑफलाइन मार्केटमध्ये देखील बंपर डिस्काउंट ऑफर उपलब्ध करण्यात आली आहे. सणासुदीच्या या काळात नवीन वस्तू खरेदी करण्याकडे अनेकजणांचा कल असतो. याच पार्श्वभूमीवर या फेस्टिव्हल सीजनच्या काळात ग्राहकांना कमी किमतीत वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी SBI च्या कार्डवर कॅशबॅकसह बंपर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे वाहन खरेदी असो किंवा स्मार्टफोन खरेदी असो, तुमच्याकडे जर SBI कार्ड असेल तर तुम्ही स्वस्तात या वस्तू खरेदी करू शकता.
कॅशबॅक ऑफर
जर तुमच्याकडे SBI चे प्युअर प्ले क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला स्पेशल कॅशबॅक ऑफर देण्यात येऊ शकतो. ही ऑफर फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येत असून या कार्डच्या माध्यमातून तुम्ही बंपर डिस्काउंट ऑफर्स देखील लाभ घेऊ शकतात. या फेस्टिवल सीजन मध्ये या कार्डच्या माध्यमातून तुम्ही शॉपिंग करत असाल तर कार्ड होल्डर्सला कंजूमर ड्यूरेबल्स, मोबाईल, लॅपटॉप, फॅशन, फर्निचर आणि ज्वेलरी, ग्रोसेरी यासारख्या बऱ्याच वस्तूंवर कॅशबॅक ऑफर देण्यात येत आहे.
2700 शहरांमध्ये SBI कार्ड देत आहे फेस्टिवल ऑफर
SBI कार्डने सध्या बऱ्याच ब्रँड सोबत पार्टनरशिप कॉन्ट्रॅक्ट साइन केलं आहे. यामुळे कार्ड होल्डर्स ला मोठ्या खरेदारीवर अप्रतिम डिस्काउंट ऑफर देण्यात येईल आणि यासोबतच SBI कार्ड कडून EMI वर मोठ्या प्रमाणात फोकस करण्यात येत आहे. त्याचबरोबर SBI कार्ड च्या माध्यमातून 2700 शहरांमध्ये SBI कार्ड धारकांना ही फेस्टिवल सीजन ऑफर देण्यात येत आहे. यामध्ये कॅशबॅक आणि डिस्काउंट ऑफर देखील उपलब्ध करण्यात येत असून यामध्ये सर्वात स्पेशल ऑफर या फ्लिपकार्ट, अमेझॉन, मिंत्रा, रिलायन्स रिटेल ग्रुप, वेस्ट साईड, PANTALOONS, मॅक्स, तनिष्क आणि TBZ या ब्रँडच्या प्रॉडक्ट वर देण्यात येत आहे.
दिवाळीपर्यंत ऑफर उपलब्ध
SBI कार्ड होल्डर्स ला फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून 600 नॅशनल लेवल ऑफर देण्यात येत आहे. त्यानुसार कार होल्डर्स ला 27.5% पर्यंत कॅशबॅक आणि डिस्काउंट ऑफर देण्यात येणार आहे. या फेस्टिवल ऑफर फक्त दसऱ्यापर्यंत नाही तर 15 नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच दिवाळीपर्यंत उपलब्ध असणार आहे. यासोबतच बँकेकडून कॅशबॅक सह रिवार्ड पॉईंट देखील देण्यात येत आहे.
EMI ऑफर
SBI कार्ड च्या माध्यमातून जर तुम्ही EMI ऑप्शनचा लाभ घेऊ इच्छित असाल तर कार्ड होल्डर्स ला कंजूमर डिलिव्हर्स मोबाईल -लॅपटॉप सेगमेंट मध्ये फायदा होऊ शकतो. त्यानुसार ग्राहकांना Samsung , LG , Sony , Oppo , Vivo , पॅनासोनीक, WHIRLPHOOL, BOSCH, IFB, HP, DELL यासारख्या बऱ्याच ब्रँडचे प्रॉडक्ट EMI वर खरेदी करता येऊ शकतात.