Hero कडून ग्राहकांना दसऱ्याचे Gift; गाड्यांवर बंपर सूट आणि ऑफर

टाइम्स मराठी । उद्या दसरा हा पवित्र सण असून या सणाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण नवीन गाडी खरेदी करतात. हेच डोळ्यासमोर ठेऊन प्रसिद्ध कंपनी Hero Motocorp ने ग्राहकांना खुश करण्यासाठी GIFT म्हणजेच ग्रँड इंडियन फेस्टिवल ट्रस्ट प्रोग्राम सुरू केला आहे. या फेस्टिवल प्रोग्राम च्या माध्यमातून ग्राहकांना दसऱ्याच्या मुहूर्तावर अप्रतिम डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे . या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही अगदी कमी पैशात गाडी खरेदी करू शकता. हिरो मोटोकोर्पचे वाहन खरेदी करण्याकडे ग्राहकांची मोठी पसंती असते. त्यानुसार कंपनीकडून फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून टू व्हीलर्स खरेदीवर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर, फायनान्स स्कीम, न्यू कलर्स ऑफर यासह बम्पर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे.

   

पे लेडर ऑप्शन देखील उपलब्ध

हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या सर्व बाईक्स आणि स्कूटर वर GIFT प्रोग्रामच्या माध्यमातून फायनान्स स्कीम उपलब्ध करण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही नवीन टू व्हीलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 5500 पर्यंत डिस्काउंट ऑफर मिळू शकते. त्याचबरोबर एक्सचेंज बोनस बद्दल बोलायचं झालं तर 3000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर हिरो मोटोकोर्प कंपनीच्या वाहनावर पे लेटर ऑप्शन देखील उपलब्ध करण्यात येत आहे. म्हणजेच तुम्ही दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बिल न भरता वाहन खरेदी करू शकतात, आणि 2024 मध्ये हे बिल भरू शकतात.

व्याजदर देखील कमी

फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून तुम्ही EMI ऑप्शन सह टू व्हीलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कंपनीकडून कमी व्याजदरामध्ये देखील वाहन उपलब्ध करण्यात येत आहे. तुम्ही हिरो मोटोकॉर्प कंपनीची कोणतीही टू व्हीलर खरेदी केल्यास 7% पेक्षाही कमी म्हणजेच 6.99% व्याजदर च्या माध्यमातून टू व्हीलर घरी घेऊन जाऊ शकतात. त्याचबरोबर प्रोसेसिंग फीस देखील कंपनीकडून माफ करण्यात आली आहे. त्यानुसार तुम्ही फक्त आधार कार्ड दाखवून टू व्हीलर खरेदी करू शकतात.