देशात स्काय बसची चर्चा जोरात!! नेमकी धावते कशी? काय आहे खास गोष्ट?

टाइम्स मराठी । आपण आपल्या दैनंदिन जीवनात गर्दीची तसेच ट्रॅफिकची समस्या अनुभवत असतो. वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी आणि थोड्याफार प्रमाणात का होईना, वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी हवेतून धावणारी बस म्हणजे स्कायबसचा पर्याय योग्य ठरू शकतो. सध्या या स्कायबसची चर्चा चांगलीच जोर धरून आहे. दिल्ली ते गुरुग्राम दरम्यान ही स्कायबस सुरु करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आहे. काय व सुरू झाल्यानंतर ट्रॅफिक मध्ये सुधारणा दिसू शकते. या स्कायबस बद्दल आपण आता सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

   

स्कायबस नेमकी आहे काय?

स्काय बस ही एक रेल्वे प्रणाली असून,मेट्रो सारखीच एक शहरी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. स्काय बस ही जवळजवळ 100 किलोमीटर प्रति तास च्या स्पीडने प्रवास करू शकते. ही एक स्वस्त पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम असून स्काय बसेस या विजेवर चालू शकतात. स्काय बसचा ट्रॅक हा उंच असतो आणि त्यामध्ये गाडीचे चाके आणि पटऱ्या ह्या एका काँक्रीट बॉक्स मध्ये फिक्स केलेल्या असतात.   ज्यामुळे ही स्काय बस पटरी वरून पलटण्याची किंवा उतरण्याची संभावना दूर होते. स्काय बस सुरू करण्याची योजना 2003 मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये करण्यात आली होती. भारत सरकारने पहिल्यांदा 2004 मध्ये स्काय बसचा ट्रायल सुरू केला होता परंतु नंतर तो थांबवण्यात आला होता.

साधारण बस आणि स्काय बस मधील फरक

साधारण बसेस या रस्त्यावर धावत असतात परंतु स्काय बस ही रस्त्याच्या वर म्हणजेच लिवेटेड ट्रॅक वर विजेवर चालते. तसेच साधारण बसेसच्या तुलनेत स्काय बसेस मध्ये इंधन बचत देखील होऊ शकते. यासोबतच प्रदूषण नियंत्रणास देखील मदत होईल. या स्काय बस मध्ये जवळपास 200  प्रवासी प्रवास करु शकतात.

तिकीट दर किती?

या स्काय बस चे तिकीट दर हे मेट्रो पेक्षा 50 टक्क्यांनी स्वस्त ठेवण्यात येणार आहे. म्हणजेच स्काय बसचा प्रवास हा मेट्रो प्रवासा पेक्षाही स्वस्त असेल. आणि स्काय बस हा सर्वसामान्यांसाठी एक फायदेशीर व परवडणारा पर्याय ठरू शकतो. देशात सर्वात आधी वाराणसी, पुणे, हैदराबाद,  गुरुग्राम आणि गोवा मध्ये स्कायबस सुरू करण्यात येणार आहे.