Samsung ने लाँच केले 2 नवे Tablet; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Samsung कंपनीने नवीन दोन टॅबलेट लॉन्च केले आहे. कंपनीने या टॅबलेटमध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध केले असून कंपनीने हा टॅबलेट वेगेवेगळ्या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे. या नवीन टॅबलेट चे नाव Galaxy Tab A9 आणि Galaxy Tab A9+ असं असून यामध्ये ग्रॅफाइड सिल्वर आणि नेव्ही कलर उपलब्ध आहे. या दोन्ही नवीन टॅबलेटच्या खरेदीवर कंपनीकडून कॅशबॅक ऑफर देखील उपलब्ध करण्यात आली आहे. आज आपण जाणून घेऊया या नवीन टॅबलेटच्या किमती आणि स्पेसिफिकेशन बद्दल….

   

स्पेसिफिकेशन

Galaxy Tab A9 या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या टॅबलेट मध्ये 8.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 60 hz रिफ्रेश रेट जनरेट करतो. आणि Galaxy Tab A9+ या नवीन टॅबलेट मध्ये 11 इंचचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 hz रिफ्रेश रेट प्रदान करतो. कंपनीने या नवीन टॅबलेट मध्ये स्नॅपड्रॅगन 695 उपलब्ध केला आहे. या टॅब मध्ये 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध करण्यात आले आहे.

कॅमेरा

Galaxy Tab A9 या टॅबलेट मध्ये फोटोग्राफीसाठी अप्रतिम कॅमेरा उपलब्ध करण्यात आला असून 8 मेगा पिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. एवढंच नाही तर समोरील बाजूला दोन मेगापिक्सेल एवढा आहे. तर दुसरीकडे Galaxy Tab A9 + या टॅबलेट मध्ये 8 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि फ्रंट मध्ये 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. या दोन्ही टॅबलेट मध्ये अप्रतिम कॉलिटी मध्ये कॅमेरा उपलब्ध करण्यात आला आहे.

बॅटरी

Galaxy Tab A9 या नवीन टॅबलेट मध्ये 5100 mAh बॅटरी देण्यात  आली आहे. तर Galaxy Tab A9 + मध्ये 7040mAh बॅटरी कंपनीने उपलब्ध केली आहे. हे दोन्ही नवीन टॅबलेट अँड्रॉइड तेरा वर बेस्ड OneUI वर काम करतात. Galaxy Tab A9 या टॅबलेट मध्ये दोन स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहेत. यासोबतच WIFI आणि 5G कनेक्टिव्हिटी यासारखे फीचर्स यामध्ये देण्यात आले आहे.

किंमत

Galaxy Tab A9 या टॅबलेट मध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट देण्यात आले आहे. त्यानुसार या टॅबलेटची सुरुवातीची किंमत 12,999 रुपये आहे. तर Galaxy Tab A9 + या टॅबलेट मध्ये दोन स्टोरेज व्हेरिएंट देण्यात आले आहे. त्यानुसार 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज टॅबलेटची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे तर 8 GB रॅम 128 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 18,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्ही हे दोन्ही टॅबलेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कंपनीने या टॅबलेट वर 3000 रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला आहे.