टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य हे राजा चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु आणि सल्लागार होते. आचार्य चाणक्य यांचे संपूर्ण नाव विष्णुगुप्त शिरोमणी असे होते. आचार्य चाणक्य यांनी बरेच लिखाण केले आहे. त्यांनी लिहिलेल्या संग्रहांपैकी नीतिशास्त्र हे संग्रह आपल्या सर्वांना ज्ञात असेल. नीतिशास्त्र या संग्रहामध्ये आचार्य चाणक्य यांनी दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त पडणाऱ्या काही नीतींबाबत माहिती दिली आहे. चाणक्य यांनी सांगितलेलं काही नीतीचे आपण पालन केल्यास आपले आयुष्य सुखदायी होऊ शकते. आचार्य चाणक्य यांनी दैनंदिन जीवना सोबतच वैवाहिक जीवनावर (Chanakya Niti For Couples) देखील भाष्य केले आहे. चाणक्यांच्या मते पती-पत्नी या दोघांमध्ये वयात अंतर असेल तर वैवाहिक जीवनात त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
आचार्य चाणक्य सांगतात की, वैवाहिक जीवन सुखी समाधानी व्हावे यासाठी पती-पत्नी या दोघांचे वय देखील महत्त्वाचे आहे. त्यानुसार वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी हे दोन्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तृप्त असतील तर वैवाहिक जीवन हे यशस्वी ठरते. यासाठी पती-पत्नी या दोघांच्या वयामध्ये योग्य अंतर असणे देखील गरजेचे आहे. जर पती-पत्नी या दोघांच्या वयामध्ये जास्त अंतर असेल तर त्याचा वैवाहिक जीवनावर वाईट प्रभाव दिसून येतो.
नवरा बायको मध्ये वयामध्ये जास्त अंतर असेल तर वैवाहिक जीवनामध्ये (Chanakya Niti For Couples) बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बऱ्याचदा वैवाहिक जीवनात मुलाचे वय जास्त आणि मुलीचे वय प्रचंड कमी असते. परंतु यामुळे पती-पत्नी दोन्हीही खुश राहू शकत नाही. वयाच्या अंतरा सोबतच मानसिक दृष्ट्या देखील दोघांच्या विचारांमध्ये मतभेद असतात. पती पत्नी दोघांचीही विचारसरणी वेगळी असल्यामुळे कोणत्याही गोष्टीवर दोघांचे एकमत होणे शक्य होत नाही.
संतान प्राप्तीसाठी देखील प्रॉब्लेम येऊ शकतो- Chanakya Niti For Couples
वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी या दोघांच्या वयामध्ये जास्त अंतर असेल तर संतान प्राप्तीसाठी देखील प्रॉब्लेम येऊ शकतो. ज्या प्रकारे वय वाढत जाते त्या प्रकारे शरीरामध्ये कमजोरी येत असते. म्हणूनच मुलाचे वय जास्त असेल आणि मुलीचे वय कमी असेल तर दोघांचे वैवाहिक जीवन सुखी समाधानी राहू शकत नाही. यामुळे चाणक्यनीती नुसार, जास्त वय असलेला पती पत्नीला खुश करू शकत नाही. आणि यामुळे वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येऊ शकतात.