टाइम्स मराठी । देशामध्ये फेस्टिवल सिझन सुरू झाला आहे. फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून बरेच ग्राहक वाहन किंवा मोबाईल यासारखे बरेच प्रॉडक्ट खरेदी करत असतात. लवकरच आता दिवाळी हा सर्वात मोठा सण येणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने भारतात सोने खरेदी करणे किंवा वाहन खरेदी करण्याला शुभ मानले जाते. त्यानुसार तुम्ही देखील यदाच्या दिवाळीमध्ये वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बऱ्याच वाहन निर्माता कंपन्या त्यांच्या गाड्यांवर बंपर डिस्काउंट ऑफर करत आहे. त्यातच तुम्ही हार्ले डेविडसन (Harley Davidson) कंपनीची बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत.
सध्या बऱ्याच कंपन्या आपल्या गाड्यांवर 20 -30 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देऊन ग्राहकांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हार्ले डेविडसनच्या बाईकवर फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून तब्बल 5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. Pan America 1250 Special, Sporster S, Nightster Bike या गाड्यांवर ही सूट देण्यात येत असून तुम्ही अगदी स्वस्तात या गाड्या घरी घेऊन जाऊ शकता.
Pan America 1250 Special
Pan America 1250 Special ही एडवेंचर टूरर बाईक आहे. या बाईकमध्ये 1252 CC V- ट्वीन, लिक्विड कुल्ड इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन 8750 RPM वर 151 BHP आणि 6,750 RPM वर 128 nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत सहा स्पीड गियरबॉक्स उपलब्ध करण्यात आले आहे. या बाईकमध्ये लीन सेन्सिटिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नरिंग, ABS, इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टीम, हिल होल्ड कंट्रोल, क्रूज कंट्रोल, ब्रेकिंग कंट्रोल यासारखे बरेच इलेक्ट्रॉनिक फीचर्स उपलब्ध आहे.
या एडवेंचर टूर बाईकवर कंपनीकडून सर्वात जास्त डिस्काउंट देण्यात येत आहे. तुम्ही ही बाईक फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 3.25 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. या बाईकची किंमत बाजारपेठेत 24.49 लाख रुपये आहे. परंतु डिस्काउंट ऑफरच्या माध्यमातून तुम्ही ही बाईक 21.24 लाख रुपयांत खरेदी करू शकाल.
Sporster S आणि Nightster Bike
Sporster S या हार्ले डेविडसडच्या बाईकवर देखील कंपनीकडून 3.25 लाख रुपये डिस्काउंट देण्यात येत आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 18.79 लाख रुपये आहे. परंतु नव्या डिस्काउंट ऑफर नंतर ही किंमत 15.54 लाख रुपये होत आहे . यासोबतच Nightster या बाईकवर देखील डिस्काउंट ऑफर कंपनीकडून उपलब्ध करण्यात येत आहे. त्यानुसार 5.25 लाख रुपयांचा डिस्काउंट कंपनीने या गाडीवर ऑफर केला आहे. तुम्ही ही बाईक डिस्काउंट ऑफर नुसार 12.24 लाख रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
Nightster Special
Nightster Special या बाईकवर कंपनीकडून सर्वात जास्त डिस्काउंट ऑफर करण्यात येत आहे. कंपनीने या पाईप वर 5.30 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर केला आहे. त्यानुसार तुम्ही ही बाईक 12.99 लाख रुपये यामध्ये खरेदी करू शकतात. कंपनीने डिस्काउंट ऑफर केलेले सर्व 2023 मधील मॉडेल आहे. यासोबतच हार्ले डेविडसनच्या 2022 च्या मॉडेलवर देखील बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे.