टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि वाढती महागाई यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची चलती मोठ्या प्रमाणात आहे. इलेक्ट्रिक वाहनांना पेट्रोल डिझेलची गरज नसल्यामुळे पेट्रोल डिझेल साठी लागणारा पैसा वाचतो. परंतु बऱ्याच इलेक्ट्रिक स्कूटर या सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या नसून त्यांचे भाव प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. परंतु भारतीय बाजारपेठेमध्ये अशा देखील इलेक्ट्रिक स्कूटर आहेत ज्या तुम्ही अगदी कमी किमतीत (Cheapest Electric Scooter) खरेदी करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्कुटर बाबत सांगणार आहोत जी तुम्ही फक्त 28 हजार रुपयांत खरेदी करू शकता. Avon E Lite असे या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव असून आज आपण तिचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.
मोटर- Cheapest Electric Scooter
Avon E Lite या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 200 W मोटर देण्यात आली आहे. यासोबत 0.57 KWH क्षमता असलेली बॅटरी पॅक देखील यामध्ये वापरण्यात आली आहे. ही बॅटरी फुल चार्ज करण्यासाठी ८ तासांचा वेळ लागतो. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कुटर 50 किलोमीटर पर्यंत रेंज देते. तसेच यावेळी या स्कुटरचे टॉप स्पीड 24 किलोमीटर प्रतीतास इतकं राहते.
बुट स्पेस
Avon E Lite या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये सिंगल सीट देण्यात आली आहे. ही मोठी आणि कम्फर्टेबल सीट आहे. स्कूटर च्या समोरच्या साईडला फुट रेस्ट आणि एक डिग्गी देण्यात आली आहे. आणि मागच्या साईडने एक बूट स्पेस बॉक्स मिळतो. या बूट स्पेस बॉक्सचा वापर हेल्मेट किंवा गरजेच्या वस्तू ठेवण्यासाठी करता येतो. एवढेच नाही तर या इलेक्ट्रिक स्कूटर ची खास गोष्ट म्हणजे या स्कूटर सोबत पेंडल देखील देण्यात आले आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक स्कूटर ची बॅटरी संपल्यानंतर या पेंडलच्या मदतीने वाहन चालवणे सोपे आणि सोयीस्कर आहे.
Avon E Lite या न्यू जनरेशन इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये BLDC मोटर वापरण्यात आली आहे. ती हाय पावर देते. त्याचबरोबर सेफ्टी साठी या इलेक्ट्रिक स्कूटर च्या फ्रंट आणि रियर चाकांमध्ये ड्रम ब्रेक वापरण्यात आला आहे. यामध्ये ट्यूबलेस टायर आणि मस्क्युलर स्टील फ्रेम देखील उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर च्या साईडला रिफ्लेक्टर देण्यात आले आहे.
किंमत किती?
AVON E LITE या इलेक्ट्रिक स्कूटर च्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, मार्केटमध्ये या इलेक्ट्रिक स्कूटर ची एक्स शोरूम किंमत 28 हजार रुपये आहे.म्हणजे हि स्वस्तात मस्त (Cheapest Electric Scooter) अशी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन ची गरज नाही. कारण नियमानुसार 25 किलोमीटर पेक्षा कमी स्पीड असलेल्या गाडयांना लायसनची गरज नसते.