Xiaomi ने आणलं वॉटरप्रूफ Smartwatch; E-Sim सपोर्टही मिळतंय, किंमत किती?

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ब्रँड Xiaomi ने भारतात वॉटरप्रूफ Smartwatch लाँच केलं आहे. Xiaomi S3 असे या स्मार्टवॉच चे नाव असून यामध्ये तुम्हाला E-Sim सपोर्ट सुद्धा देण्यात आलं आहे. या नवीन स्मार्ट वॉच मध्ये स्टेनलेस स्टील चा वापर करण्यात आला आहे. आज आपण Xiaomi च्या या नव्या स्मार्ट वॉचचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत जाणून घेणार आहोत.

   

फिचर्स

Xiaomi S3 या स्मार्टवॉच मध्ये स्टेनलेस स्टील केसिंग देण्यात आली आहे. या स्मार्ट वॉच सोबत ब्राऊन लेदर बेल्ट उपलब्ध आहेत. यासोबतच स्मार्टवाच मध्ये eSIM व्हर्जन सोबतच ब्लूटूथ मॉडेल देखील मिळत. यामध्ये फ्लोरिंग रबल बेल्ट देण्यात येतात. या स्मार्टवॉचमध्ये  कंपनीने दीडशे पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड उपलब्ध केलेअसून अप्रतिम हेल्थ फीचर्स देखील यामध्ये आहे. या स्मार्ट वॉच मध्ये GPS सपोर्ट मिळतो.

डिझाईन

 Xiaomi S3 ही स्मार्टवॉच हायपर OS वर काम करते. यामध्ये गोल डायल देण्यात आले आहे. हे स्मार्टवॉच इंटरचेंजेबल बेजल डिझाईन मध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचच्या वॉच फेस मध्ये एक्सक्लुझिव्ह डायनामिक ॲनिमेशन आणि साऊंड इफेक्ट मिळतात. याशिवाय  5ATM वॉटर रजिस्टन्स  सपोर्ट या स्मार्टवॉचमध्ये आहे. म्हणजेच तुम्ही हे स्मार्टवॉच  स्विमिंग वेळी देखील वापरू शकता.

स्पेसिफिकेशन

Xiaomi S3 या स्मार्टवॉच मध्ये 1.43 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 600 नीट ब्राईटनेस ने सुसज्ज आहे. Xiaomi कंपनीच्या या नवीन स्मार्टवॉच मध्ये 486 mAh बॅटरी उपलब्ध आहे. ही बॅटरी नॉर्मल युज केल्यावर सात दिवसापर्यंत चालते. आणि LTE व्हर्जन वर हेव्ही युज केल्यावर तीन दिवसांपर्यंत चालते. ब्लूटूथ मॉडेल ची बॅटरी ही नॉर्मल युज केल्यावर 15 दिवसांपर्यंत चालते. आणि ऑलवेज ऑन डिस्प्ले AOD च्या माध्यमातून पाच दिवसांपर्यंत ही बॅटरी चालते.

किंमत किती?

Xiaomi S3 या स्मार्ट वॉच मध्ये हार्ट रेट सेंसर, SpO2 सेंसर, 150 स्पोर्ट्स मोड सपोर्ट उपलब्ध आहे. यामध्ये हार्ट रेट साठी 12 चैनल आणि  GPS ट्रॅकिंग साठी इंडिपेंडेंट ड्युअल फ्रिक्वेन्सी फाईव्ह सॅटॅलाइट पोझिशनिंग देखील देण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच ब्लॅक, सिल्वर आणि ब्राऊन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केलं आहे  Xiaomi S3 च्या eSIM मॉडेलची किंमत 11,368 रुपये आहे. आणि ब्लूटूथ मॉडेल ची किंमत  9,092  रुपये आहे.