Renault ने आणली नवी SUV Car; स्टाईल आणि लूकचे तुम्हीही व्हाल दिवाने

टाइम्स मराठी । Renault ने ग्लोबल मार्केटमध्ये नवीन SUV कार लॉन्च केली आहे.  Renault Kardian असे या नव्या SUV चे नाव असून ती CMF मॉड्युल प्लॅटफॉर्मवर बेस्ड आहे  Renault India कंपनीने ही SUV दक्षिण अमेरिकी मार्केट साठी डेव्हलप केली आहे. लवकरच या कारची विक्री  ब्राझील आणि मोरक्को मध्ये सुरू करण्यात येणार आहे.  ही SUV भारतीय बाजारपेठेमध्ये केव्हा लॉंच करण्यात येईल याबाबत कोणतीच माहिती उपलब्ध करण्यात आली नाही. आज आपण जाणून घेऊया या कारचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन

Renault Kardian या SUV मध्ये 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन 123 BHP पावर आणि 220 nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत सहा स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअर बॉक्स सुसज्ज करण्यात आले आहे. या SUV च्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर, ही कार ड्युअल टोन एक्सटिरियर सह उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये डबल लेयर फ्रंट ग्रील देण्यात आले आहे. या डबल लेयर फ्रंट ग्रीलच्या दोन्ही साईडने LED डे टाईम रनिंग लाईट वापरण्यात आले आहे. यामध्ये हेडलॅम्प वेगवेगळ्या पोड्स मध्ये  स्थित आहे. ही कार 4.12 मीटर एवढी लांब आहे. यामध्ये C आकारामध्ये टेललॅम्प युनिट वापरण्यात आले आहे.

फिचर्स

Renault Kardian या SUV च्या इंटेरियल मध्ये 8 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हील्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर , डॅशबोर्ड लेआऊट, फॉक्स ब्रश्ड ॲल्युमिनियम, ड्राईव्ह मोड सिलेक्टर, पियानो ब्लॅक फिनिशिंग सह वूड इन्सर्ट करण्यात आले आहे. यासोबतच  LED हेडलाईट, टेललॅम्प, 17 इंच अलॉय व्हील्स यासारखे फीचर्स मध्ये देण्यात आले आहे.