टाइम्स मराठी । सर्वत्र दिवाळीची तयारी सुरू आहे. भारतामध्ये दिवाळीला वाहन खरेदी करणे हे शुभ मानले जाते. त्यानुसार बरेच जण नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असतात. दुसरीकडे दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या सुद्धा आपल्या गाड्यांवर बम्पर सूट देऊन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही देखील यंदाच्या फेस्टिवल सीझनमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Ather कंपनीची इलेक्ट्रिक स्कुटर तुम्ही कमी पैशात घरी घेऊन जाऊ शकता. ही ऑफर नेमकी काय आहे ते आपण जाणून घेऊयात.
एक्सचेंज ऑफर
Ather कंपनीने गाड्यांची विक्री जोरदार व्हावी यासाठी Ather 450S आणि Ather 450X या इलेक्ट्रिक स्कूटर वर बंपर डिस्काउंट ऑफर उपलब्ध केले आहे. यासोबतच येथे कंपनीने एक्सचेंज ऑफर देखील दिली आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्याकडे असलेले पेट्रोल वाहन एक्सचेंज करून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. या एक्सचेंज ऑफरवर कंपनीकडून 40,000 रुपये एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. ही ऑफर पेट्रोल वाहनांवरून इलेक्ट्रिक मध्ये शिफ्ट होण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे.
Ather energy ने ग्राहकांसाठी उपलब्ध केलेली फेस्टिवल ऑफर ही 15 नोव्हेंबर पर्यंत आहे. या ऑफरच्या माध्यमातून ग्राहक कमी किमतीत वाहन खरेदी करू शकतात. या इलेक्ट्रिक स्कूटर वर 5000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. यासोबतच 1500 रुपयाचा कॉर्पोरेट बोनस कंपनीकडून देण्यात येत आहे. अथर कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर वर बँक ऑफर देखील उपलब्ध आहे. त्यानुसार तुम्ही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून वाहन खरेदी करणार असाल तर ६ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे.
Ather कंपनीने फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून दिलेल्या ऑफर मध्ये EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. तुम्ही जर EMI च्या माध्यमातून वाहन खरेदी करणार असाल तर कॅशबॅक ऑफर उपलब्ध करण्यात आले आहे. EMI च्या माध्यमातून वाहन खरेदी करण्यासाठी 6 टक्क्यांपेक्षा कमी व्याजदर कंपनीकडून देण्यात येत आहे. ही EMI ऑफर 24 महिन्यांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर वर लागणारे व्याज हे 12 हजार रुपयांपर्यंत वाचवू शकतात.
Ather 450S स्पेसिफिकेशन
Ather 450S या स्कूटरमध्ये 3300W ची मोटर देण्यात आलेली आहे. इलेक्ट्रिक स्कूटर फास्ट चार्जर ने पाच तासात चार्ज होते. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हि इलेक्ट्रिक स्कुटर 115 किलोमीटर पर्यंत रेंज देते तसेच 90 किलोमीटर प्रति तास इतकं आहे. 111.6kg वजन असलेली ही इलेक्ट्रिक स्कूटर वेगवेगळ्या फीचर्सने परिपूर्ण आहे. Ather 450S या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आले आहे. यामध्ये एलटीइ कनेक्टिव्हिटी, कॉल अँड SMS अलर्ट, म्यूओर कंट्रोल, मल्टिपल थीम आणि नाईट मोड, ऑटो ऑफ टन इंडिकेटर, गाईड मी होम लाईट, डॉक्युमेंट स्टोरेज, OTS सॉफ्टवेअर अपडेट, आणि हिल होल्ड कंट्रोल हे फीचर्स यामध्ये देण्यात आलेले आहे. ही स्कूटर Ola S1 या इलेक्ट्रिक स्कूटर सोबत प्रतिस्पर्धा करते. या इलेक्ट्रिक स्कूटर ची एक्स शोरुम किंमत 1,29,999 रुपये एवढी आहे.
Ather 450X स्पेसिफिकेशन
Auther 450X ही स्कूटर एकदा चार्जिंग केल्यानंतर 146 किलोमीटर पर्यंत चालते. त्याचबरोबर 90kmph टॉप स्पीड देते. Ather 450X या स्कूटरमध्ये 6.2 kw मोटर उपलब्ध असून 3.7 kwh लिथियम आयन बॅटरी देण्यात आलेली आहे. यामध्ये 3300 w ची मोटर आहे. ती चार्ज होण्यासाठी 15 तास लागतात. आणि फास्ट चार्जर ने 5 तासात ही स्कूटर पूर्णपणे चार्ज होते. यामध्ये LED हेडलाईट, 7 इंच चा TFT , हिल असिस्ट, ब्लूटूथ कम्पेबिलिटी, म्युझिक आणि कॉल डिस्प्ले, ऑटो इंडिकेटर ऑफ, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, डॉक्युमेंट स्टोरेज ओटीए (ओव्हर द एयर) अपडेट आणि रिमोट चार्ज मॉनिटरिंग यासारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत. या स्कूटर ची एक्स शोरूम किंमत 1.28 लाख रुपयांपासून 1.49 लाख रुपयांपर्यंत आहे.