टाइम्स मराठी । भारतीय मार्केट मध्ये Tata Motors या आघाडीच्या कंपनीने सर्व ग्राहकांचे मन जिंकले आहे. या स्वदेशी कंपनीच्या कार या सेफ्टी रेटिंग मुळे अतिशय लोकप्रिय आहेत. सध्या भारतात दिवाळीकडे लोक डोळे लावून बसले आहेत. अनेकजण दिवाळीच्या शुभमुहूर्ती नवनवीन गाड्या खरेदी करतात. तुम्ही सुद्धा यंदाच्या दिवाळीत नवी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर Tata Nexon तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरेल. टाटा नेक्सनच्या या नवीन व्हर्जनला ग्लोबल NCP क्रॅश टेस्टमध्ये सेफ्टी साठी 5 स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आली. यामध्ये आकर्षक डिझाईन, नवीन इंटेरियर, अप्रतिम फीचर्स देण्यात आले असून ही कार आता अपडेट करण्यात आली आहे. यंदा दिवाळीला तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही कार बेस्ट असेल. जाणून घ्या या कारचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.
फिचर्स
New Tata Nexon fecelift या मॉडेलमध्ये कंपनीने फक्त एक्स्टर्नल नाही तर इंटरनल डिझाईन देखील अपडेट केले आहेत. या कार मध्ये डिझाईन करण्यात आलेल्या इंटिरियर बद्दल बोलायचं झालं तर, इंटरियर मध्ये नवीन दोन स्पोक स्टीयरिंग व्हील, डॅशबोर्ड लेआउट आणि इंटेरियर कलर देण्यात आले आहे. यामध्ये 10.25 इंच चा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, 10.25 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जिंग, व्हेंटिलेटर फ्रंट सीट, क्रूज कंट्रोल, पेंडल शिफ्टर यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
स्पेसिफिकेशन
New Tata Nexon fecelift model मध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन ऑप्शन उपलब्ध आहे. त्यानुसार 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन यात उपलब्ध आहे. हे इंजिन 120 BHP पावर आणि 170 nm पीक टॉर्क जनरेट करते. आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन हे 115 BHP पावर आणि 260 NM पीक टॉर्क जनरेट करते. या फेसलिफ्ट पेट्रोल इंजिन मध्ये 5 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड AMT, न्यू 7 स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन हे ऑप्शन उपलब्ध आहेत. त्याचबरोबर डिझेल इंजिन सह 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड आहे AMT ट्रान्समिशन उपलब्ध आहेत.
किंमत
टाटा मोटर्सची नेक्सन हा पर्याय तुम्हाला दिवाळीमध्ये वाहन खरेदी करण्यासाठी अप्रतिम आहे. टाटा नेक्सनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 8.10 लाख रुपये आहे. आणि टॉप व्हेरिएंट ची किंमत 13 लाख रुपये आहे. जर तुमचे बजेट 10 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर टाटा नेक्सन फेसलिफ्ट चे बेस मॉडेल तुमच्यासाठी बेस्ट असेल.