Rashi Bhavishya November 2023 : 400 वर्षांनंतर जुळून आलाय शनी रवी पुष्य नक्षत्र योग; या व्यक्तींना होणार मोठा धनलाभ

टाइम्स मराठी । नोव्हेंबर महिना (Rashi Bhavishya November 2023) सुरू झाला आहे.  हा महिना बऱ्याच राशींसाठी शुभ ठरणार आहे. कारण या महिन्यांमध्ये विविध दुर्लभ राजयोग आणि ग्रह परिवर्तन होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला शुक्र गोचर होणार आहे. यासोबतच दिवाळीच्या दोन दिवस आधी रवी पुष्य नक्षत्र योग आणि आठ राजयोग जुळून येणार आहे. एवढेच नाही तर शनिदेव कुंभ राशीमध्ये मार्गी देखील होणार आहेत. त्यामुळे यंदाचा नोव्हेंबर महिना हा  ४ राशींसाठी श्रीमंतीची संधी घेऊन येईल.

   

केव्हा जुळून येत आहे राजयोग

ज्योतिष शास्त्रानुसार राशींचे १२ प्रकार पडतात. ग्रह परिवर्तन, राजयोग या सर्वांचा प्रभाव बारा राशींवर पडत असतो. हा प्रभाव कधी शुभ तर कधी अशुभ असतो. आता  4 नोव्हेंबरला शनी पुष्ययोग आणि 5 नोव्हेंबरला रविपुष्य योग जुळून येत आहे. हा पुष्य नक्षत्रातील  दुर्मिळ योग असून  तब्बल 400 वर्षांनंतर हा योग जुळून येत आहे. हा काळ दिवाळीपूर्वी खरेदी करण्यासाठी शुभ असणार आहे. या राज योगाचा शुभ प्रभाव काही राशींवर (Rashi Bhavishya November 2023) पडणार आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी.

कोण कोणते योग जुळून येतील

शनिवारी आणि रविवारी पुष्य नक्षत्रामध्ये रवी आणि शनी योग जुळून येत आहे. 4 नोव्हेंबरला शनिवारी सकाळी 8:00 वाजता पुष्य नक्षत्र सुरू होईल. आणि रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत शुभ योग कायम राहील. यासोबतच 4 नोव्हेंबरला अन्य अष्ट महाराजयोग देखील जुळून येत आहे. तसेच 4 नोव्हेंबरला शंख, लक्ष्मी, हर्ष,  सरल, साध्य, मित्र, गजकेसरी योग देखील जुळून येणार आहे. या दिवशी शनी आपल्याच राशीमध्ये  18° मध्ये मार्गी असेल.

या राशींना होणार लाभ– Rashi Bhavishya November 2023

१) मेष-

शनि आणि रवी पुष्य नक्षत्राचा शुभ लाभ मेष राशींच्या व्यक्तींना होणार आहे. दिवाळीपूर्वी शनी गुरुचा आशीर्वाद मेष राशींच्या व्यक्तींवर असेल. या काळामध्ये खरेदीसाठी शुभ योग असेल. मेष राशींच्या व्यक्तींना धन लाभाच्या रूपामध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. यासोबतच  या राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. या राशींच्या व्यक्तीने केलेली जुनी गुंतवणूक तुम्हाला लाभ देऊ शकते.

२) मिथुन-

मिथुन राशींच्या व्यक्तींना या काळामध्ये प्रगतीच्या संधी  चालून येणार आहेत. या राशींच्या व्यक्तींची रखडलेली कामे मार्गी लागतील. शनि आणि गुरूमुळे लक्ष्मी माता मिथुन राशींच्या व्यक्तींवर प्रसन्न असेल. मिथुन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये आलेल्या अडचणी दूर होऊ शकतात.

३) कर्क-

कर्क राशींच्या व्यक्तींवर राजयोगाचा प्रभाव दिसून येईल. या राशींच्या व्यक्तींची रखडलेली कामे सुरू होतील. कर्क राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात आलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीचा लाभ या राशीतील व्यक्तींना होऊ शकतो.

४) धनु-

धनु राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात आलेल्या अडचणी या काळात दूर होतील. दिवाळीपूर्वी धनु राशींच्या व्यक्तींना धनलाभ होऊ शकतो. गुरु आणि शनी मुळे लक्ष्मी माता या राशींना धन लाभाच्या रूपामध्ये प्रगतीच्या संधी देऊ शकते. ज्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. धनु राशींचे व्यक्तींनी केलेली जुनी गुंतवणूक या काळात लाभ देऊ शकते.