टाइम्स मराठी । लक्झरी कार निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या BMW ने भारतामध्ये BMW MINI Charged Edition लाँच केलं आहे. ही कार All Electric MINI 3Dore Kuper SE या कारवर बेस्ड आहे. कंपनी ही कार कम्प्लीटली बिल्ड युनिट CBU पद्धतीने देशामध्ये उपलब्ध करणार आहे. त्यानुसार भारतात या कारचे फक्त 20 युनिट विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. BMW कंपनीने यामध्ये बरेच फीचर्स ऍड केले असून स्टॅंडर्ड वेरियंटच्या तुलनेत ही अपग्रेडेड कार असेल. या नवीन लॉन्च झालेल्या कारची किंमत 55 लाख रुपये एवढी आहे. जाणून घेऊया या कारचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.
BMW MINI Charged Edition मध्ये कंपनीने चिली रेड कलर ऑप्शन उपलब्ध केले असून कारचे रुफ व्हाईट कलरच्या मल्टीटोन मध्ये उपलब्ध आहे. यासोबतच एस्पेन व्हाईट एक्स्टेरियल ट्रिम मध्ये आहे. या कार मध्ये हेडलाईट, टेललाईट रिंग्स, डोअर हँडल आणि लोगो एकाच कलर मध्ये दिसत आहे. या कारच्या बोनेट आणि दरवाजांवर फ्रोजन रेड लाईन आणि हायलाईट्स पिवळ्या रंगांमध्ये दिसत आहे. या कारच्या चाकांबद्दल बोलायचं झालं तर 17 इंचचे पावर स्पोक अलॉय व्हील यामध्ये देण्यात आले आहे.
इंटेरियर– BMW MINI Charged Edition
BMW MINI Charged Edition च्या इंटरियर बद्दल बोलायचं झालं तर, या कारच्या केबिनमध्ये लेदरेट कार्बन ब्लॅक अपहोल्स्ट्री अपग्रेड करण्यात आले आहे. यामध्ये ब्लॅक पॅनलसह 5 इंच MID युनिट वापरण्यात आले आहे. केबिनमध्ये सेंट्रलला देण्यात आलेल्या इन्फोटेनमेंट सिस्टीमला 8.8 इंच टच स्क्रीन युनिटने नियंत्रित केले जाते. यासोबतच कारच्या केबिनमध्ये स्टार्ट स्टॉप ट्रॉगल स्विच, गिअर लिव्हर, डोअर सील्स बेजिंग वर एनर्जेटिक येल्लो एक्सेंट देण्यात आली आहे.
बॅटरी पॅक आणि मोटर
या कारमध्ये 135 KW इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 181 BHP पावर आणि 270 nm पीक टॉर्क जनरेट करते. ही इलेक्ट्रिक हॅशबॅक 7.3 सेकंदात 0 ते 100 KM घंटा एवढी रेंज देते. इलेक्ट्रिक मोटर सोबतच या कार मध्ये 32.6 KWH बॅटरी पॅक देखील देण्यात आले आहे. ही बॅटरी फुल चार्ज केल्यानंतर 270 किलोमीटर रेंज देते.
फिचर्स
गाडीच्या अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, या कारमध्ये इनबील्ड नेव्हिगेशन, एप्पल कार प्ले, हरमन कार्डन स्पीकर सिस्टीम, वायरलेस चार्जिंग, इम्पॉर्टंट सिस्टीम, हेडलाईट, टेललाईट, यासारखे बरेच फीचर्स देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक कार मध्ये स्पोर्ट आणि ग्रीन हे दोन ड्राइविंग मोड देण्यात आले आहे.