टाइम्स मराठी । टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी BSNL ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन आणत असते. सध्या Jio आणि Airtel या टेलिकॉम कंपन्या वेगवेगल्या ऑफर्स ग्राहकांना देत आहेत. जेणेकरून ग्राहक जिओ किंवा एअरटेलचे रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकतील. ज्यामुळे जिओ किंवा एअरटेल युजर्सची संख्या वाढेल. परंतु आता BSNL देखील या स्पर्धेमध्ये उतरला आहे. BSNL कंपनी ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन उपलब्ध करत असून अप्रतिम प्रॉफिट ग्राहकांना देत आहे. यापूर्वी BSNL चे मार्केटमध्ये खूप नाव होते. परंतु त्यानंतर प्रायव्हेट प्लेयर्सची एन्ट्री आणि टेलिकॉम ऑपरेटर ची खराब क्वालिटी यामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली. परंतु आता BSNL ने पुन्हा मार्केटमध्ये एन्ट्री केली असून BSNL च्या टेलिकॉम सर्विसेस आता बरेच लोक वापरत आहेत.
BSNL कंपनीच्या टेलिफोन सर्विसेस बरेच ग्राहक वापरत आहे. त्याचबरोबर कंपनीचे ग्राहकांसाठी परवडणाऱ्या किमतीमध्ये बरेच प्लॅन उपलब्ध आहेत. या प्लान च्या माध्यमातून ग्राहकांना फायदा होऊ शकतो. BSNL ने सिनेमा प्लस पोर्टफोलिओ मध्ये तीन प्लॅन्स उपलब्ध केले आहे. या प्लान ची किंमत 49 रुपयांपासून सुरू होते. या प्लॅनमध्ये OTT प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शन देण्यात आले आहेत.
BSNL 49 RS Cinema Plus Portfolio plans
BSNL कंपनीचा हा 49 रुपयांना रिचार्ज प्लॅन मध्ये यूजर साठी बऱ्याच ओटीडी प्लॅटफॉर्म चे एक्सेस देण्यात येणार आहे. BSNL कंपनी ने कमी किमतीमध्ये बरेच रिचार्ज ऑफर ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे. या ऑफर च्या माध्यमातून कमी किमतीमध्ये OTT ऍक्सेस मिळू शकतो. तुम्ही 49 रुपयांवाला रिचार्ज प्लॅन घेतला तर ग्राहकांना LIONSGATE, SHEMAROOME, HUNGAMA, EPICON या 4 ओटीटी प्लॅटफॉर्म चे ॲक्सेस मिळेल.
BSNL 199 RS Cinema Plus Portfolio plans
BSNL कंपनीच्या सिनेमा प्लस पोर्टफोलिओ मध्ये उपलब्ध असलेल्या दुसऱ्या प्लॅनची किंमत 199 रुपये आहे. या प्लॅन मध्ये ग्राहकांना Zee5, SonyLIV, YuppTV आणि Disney + Hotstar या OTT प्लॅटफॉर्म चे सबस्क्रिप्शन मिळेल. जेणेकरून ग्राहक OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घेऊ शकतील.
BSNL 249 RS Cinema Plus Portfolio plans
BSNL कंपनीच्या सिनेमा प्लस पोर्टफोलिओ मध्ये ZEE5 Premium, Sony LIV Premium, YuppTV, Shemaroo, Hungama, Lionsgate, Disney + Hotstar या OTT प्लॅटफॉर्म चे ॲक्सेस मिळतात. या प्लान ची किंमत 259 रुपये एवढी आहे.