Google ने लॉन्च केले नवीन फीचर; आता फोटो वरील अक्षरे कॉपी करणे झाले सोपे

टाइम्स मराठी । Google अँड्रॉइड आणि iOS यूजर साठी वेगवेगळे अपडेट आणि फीचर्स रोलआउट करत असते. या फीचर्सच्या माध्यमातून युजर्स ला  फायदा होतो. आता गुगलने अँड्रॉइड युजर साठी GBOARD नावाने नवीन फीचर लॉन्च केले आहे. या फीचर च्या माध्यमातून आता युजर्स ला मजेशीर फायदा होणार आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या फीचर्स बाबत गुगलकडून घोषणा करण्यात आली नसून या नवीन लॉन्च करण्यात येणाऱ्या फीचर बाबत लीक च्या माध्यमातून माहिती मिळाली. या नवीन लॉन्च करण्यात येणाऱ्या फीचरमुळे युजर्स कोणत्याही फोटो वरील टेस्ट कॉपी करू शकतील.

   

काय आहे हे फीचर

गुगलचे  GBOARD हे अपकमिंग फीचर ट्रान्सलेट आणि प्रूफ रीडिंग या कामासाठी मदत करू शकते. याशिवाय तुम्ही या फीचरच्या माध्यमातून एखादा फोटो स्कॅन करून टेक्स्ट कॉपी करू शकतात. एवढेच नाही तर कॉपी केलेले शब्द तुम्ही पेस्ट देखील करू शकतात. हे फीचर तुम्ही कॅमेरा मध्ये देखील वापरू शकतात. म्हणजेच स्कॅन करणे सोपे होईल. GBOARD हे नवीन फिचर अँड्रॉइड 13.6 बीटा साठी उपलब्ध करण्यात आले आहे.

या पद्धतीने फोटो वरील टेक्स्ट करा कॉपी

GBOARD हे फिचर ट्रान्सलेट आणि प्रूफ रिडींग टॉगल मध्ये दिसते. या टॉगल वर क्लिक केल्यानंतर स्क्रीनच्या खालच्या साईडने तुम्हाला व्ह्यू फाईंडर दिसेल. या व्ह्यू फाईंडर च्या माध्यमातून युजर्स कोणताही फोटो  सिलेक्ट करता येईल. एवढेच नाही तर  या फीचरच्या माध्यमातून फोटो क्लिक देखील करता येईल. त्यासाठी कॅमेरा परमिशन असणे गरजेचे आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला फोटो वरील टेक्स्ट कॉपी करण्याचे ऑप्शन दिसेल.