कोणतेही काम करताना ‘या’ गोष्टीची काळजी घ्यावी; पहा काय सांगते चाणक्यनीती

टाइम्स मराठी । विष्णुपंत शिरोमणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आचार्य चाणक्य यांचे चाणक्य नीति ही आयुष्यात प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करत असते. आचार्य चाणक्य हे राजनीति शास्त्रज्ञ, महान अर्थशास्त्रज्ञ, कौटिल्य म्हणून ओळखले जातात. आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या संग्रहांपैकी राजनीति अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र हे प्रमुख संग्रह सर्वांच्या ओळखीतील आहे. आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये सांगितलेल्या नियमांचे पालन केल्यास  जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करण्याची ताकद मिळते. एवढेच नाही तर आयुष्यात येणाऱ्या संकटांवर कशा पद्धतीने मात केली पाहिजे यावर देखील आचार्य चाणक्य मार्गदर्शन करतात. आजच्या चाणक्य नीति मध्ये, आचार्य चाणक्य यांनी विचार करून महत्वपूर्ण निर्णय घेण्याबाबत भाष्य केले आहे.

   

१) कोणताही निर्णय घेण्यापूर्वी  विचार करणे गरजेचे

आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणतीही गोष्ट करत असताना त्यावर विचार करणे गरजेचे असते. जेणेकरून आपण केलेल्या कामाचा उलटा प्रभाव आपल्यावर पडू नये. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करूनच, सावधानी पूर्वक निर्णय घेतला पाहिजे . बऱ्याचदा आपण घाई गडबडीमध्ये मागचा पुढचा विचार न करता  एखादा निर्णय घेतो. परंतु आपण घेतलेल्या निर्णयामुळे किती नुकसान आणि प्रॉफिट होईल याचा विचार केला पाहिजे. जेणेकरून आपल्याला  पुढे घडणाऱ्या संकटांना मात करता येईल.

२) इतरांवर अंधविश्वास ठेवू नका.

बरेच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींवर अंधविश्वास ठेवतात.  परंतु यामुळे त्यांचे सर्वात मोठे नुकसान होते. इतरांवर विश्वास ठेवून त्यांना कोणती गोष्ट सांगितल्यामुळे तुम्ही अडचणी मध्ये येऊ शकतात. यासोबतच तुम्हाला एखादी गोष्ट करण्याला प्रेरणा मिळत नाही तर मागे खेचले जाते. म्हणून कधीही स्वतः नुकसान आणि प्रॉफिट दोन्ही गोष्टींचा विचार करूनच सावधानी पूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे.

३) महिला आणि राजघराण्यांवर विश्वास ठेवू नये

आचार्य चाणक्य म्हणतात की, कधीच महिलांवर आणि राज घराण्यावर विश्वास ठेवू नका. यासोबतच नख असलेल्या, आक्रमक प्राणी आणि शस्त्र वापरणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवणे देखील चुकीचे आहे. अशा व्यक्तींपासून सतत सावध राहावे लागते. कारण असे व्यक्ती कधी धोका देतील हे सांगता येत नाही. आणि आपण घेतलेला निर्णय अशा व्यक्तींना बोचण्याची शक्यता असते. आणि कधीही तुमच्यावर वार होऊ शकतो. म्हणून अशा व्यक्तींपासून लांब राहणे गरजेचे आहे.