… तर तुमचेही Gmail अकाउंट होणार बंद; Google करणार कारवाई

टाइम्स मराठी । Google हे सर्च इंजिन युजर्सला अप्रतिम अनुभव देत असते. हा अनुभव कधी विचारलेल्या प्रश्नांचा असतो, तर बऱ्याचदा  गुगलमध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्स मुळे असतो. गुगलच्या माध्यमातून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधले जाते. एवढेच नाही तर , बातम्या, फॅशन रिलेटेड, डिझाइन्स, बाईक्स, अगदी मनात आलेला कोणताही प्रश्न आपण गुगल ला विचारतो. जेणेकरून आपल्या प्रश्नाचे समाधानकारक  उत्तर मिळू शकेल. आपण गुगल प्रमाणे Gmail चा देखील वापर करत असतो. ऑफिशियल, पर्सनल,  बँक रिलेटेड, खाजगी सरकारी योजनेसाठी, जॉब साठी बऱ्याच कामांसाठी Gmail ची मदत आपण घेतो. परंतु आता गुगल हे Gmail अकाउंट बंद करण्याच्या तयारीत आहे.

   

पुढच्या महिन्यापासून सुरू होईल प्रक्रिया

Gmail अकाउंट डिलीट करण्यासाठी डिसेंबर महिन्यापासून google  प्रक्रिया सुरू करणार आहे. चांगलं ऑनलाईन एन्व्हायरमेंट आणि बेटर सिक्युरिटी साठी गुगलने हा निर्णय घेतला आहे. जे Gmail अकाउंट सातत्याने वापरले जात नाही, असे अकाउंट गुगलकडून डिलीट करण्यात येऊ शकतात. त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी बऱ्याच काळापासून Gmail अकाउंटचा वापर केलेला नसेल,  किंवा Gmail अकाउंट ऍक्टिव्ह केलेलं नसेल, त्यांना या कारवाईचा मोठा फटका बसू शकतो.

यामुळे घेतला गुगलने हा निर्णय 

काही व्यक्ती Gmail अकाउंट मोठ्या प्रमाणात वापरत नाही. जुने Gmail अकाउंट आणि सक्रिय नसलेल्या Gmail अकाउंटला सायबर क्राईम अंतर्गत धोका निर्माण होऊ शकतो.  सायबर गुन्हेगाराकडून सक्रिय नसलेले गुगल अकाउंट  हॅक केले जातात. आणि यामध्ये जुन्या आणि रियूज पासवर्ड चा वापर करून अकाउंट  वापरले जाते. Gmail अकाउंट  वापरामध्ये नसल्यामुळे टू फॅक्टर एथेन्शियल  युजर्स करत नाही. त्यामुळे सायबर गुन्हेगारांना Gmail अकाउंट हॅक करणे सोपे जाते. म्हणूनच  गुगलने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून Gmail अकाउंट च्या माध्यमातून सायबर हल्ले होणार नाही.

Gmail अकाउंट सोबतच सर्व माहितीही होईल डिलीट

गुगलने याबाबत माहिती दिली आहे. जर तुमचे Gmail अकाउंट दोन वर्षांपासून वापरले गेले नसेल, किंवा साइन अप करण्यात आलेलं नसेल तर अकाउंट डिलीट करण्यात येईल. या वापरात नसलेल्या जीमेल मध्ये असलेली सर्व माहिती गुगलने केलेल्या कारवाईनंतर डिलीट करण्यात येणार आहे. ज्यामध्ये वर्कप्लेस, डेटा, जीमेल डॉक्स, मीट, कॅलेंडर, फोटो हे सर्व डिलीट करण्यात येईल. त्याचबरोबर गुगल कडून सुरु करण्यात येणारी ही कारवाई सुरू होण्यापूर्वी तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळेल.