टाइम्स मराठी । लहान मुलांमध्ये गेम खेळण्याचे, भुताच्या गोष्टी ऐकण्याचे वेगळंच क्रेझ असते. याच्या माध्यमातून ते त्यांचं मनोरंजन करतात. आपण भूत प्रेत या गोष्टींना मानत नसलो तरी बरेच जण या गोष्टींवर आणि आत्मांवर विश्वास ठेवतात. त्याचप्रमाणे लहान मुलांनी या भुताच्या गोष्टी ऐकताना त्यांच्या मनावर प्रभाव पडतो. आणि त्यांना खरंच भूत असते की काय असा प्रश्न पडतो. तुमचा विश्वास बसणार नाही पण असा एक गेम आहे ज्यामुळे आपण भूतांसोबत संपर्क करू शकतो. या गेमच नाव आहे ऑइजा बोर्ड. या गेम मध्ये एका बोर्डवर लोक भूतांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. या बोर्डवर प्रश्न लिहिले जातात. आणि या प्रश्नांचे उत्तर भूत देतात. मात्र हा गेम खेळतानाच असं काहीतरी घडलं कि, 28 मुलींना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. नेमकं काय झालं आपण पाहूया.
कोलंबिया मधील एका शाळेच्या मैदानात मुली ऑइजा बोर्ड हा गेम खेळत होत्या. त्यावेळी भीतीमुळे बऱ्याच जणींना अस्वस्थ वाटायला लागलं. अनेक मुली बेशुद्ध पडल्या. तर काहींना दिसणं देखील बंद झालं होतं यामुळे स्कूलच्या प्रिन्सिपल आणि टीचर्स ने 28 मुलींना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. सर्वात आधी एका मुलीला हा प्रॉब्लेम झाला. त्यानंतर सर्वांना हाच प्रॉब्लेम होऊ लागला. यानंतर स्कूल प्रशासनाने सर्व मुलींना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर 28 पैकी काही मुलींची तब्येत ठीक आहे. तर दहा टक्के मुली अजूनही अस्वस्थ आहेत. यापूर्वी देखील कोलंबीयामध्ये अशी घटना घडलेली आहे. या घटनेचा तपास करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.
Indy 100 या वेबसाईट नुसार या शाळेचे संचालक हयुगो यांनी ही घटना गांभीर्याने समजण्याचे आवाहन केलेले आहे. त्यांनी सांगितले की मुलांच्या आहारामुळे असं घडण्याची शक्यता असून भूत प्रेत हा तपासाचा विषय आहे. परंतु झालेल्या मुलींच्या आईंनी आहारामुळे असं होऊ शकत नसल्याचा स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितलं की मुली नेहमी नाश्ता करून शाळेत येतात. त्यामुळे ही घडलेली घटना नेमकी कशामुळे झाली असेल त्याचा तपास सुरू आहे.