Royal Enfield ला टक्कर देणार Honda ची ‘ही’ Bike; तरुणाई होणार खुश

टाइम्स मराठी । वाहन निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी कंपनी Honda भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये वाहन लॉन्च करत असते. आता कंपनीकडून भारतीय बाजारपेठेत नवीन बाईक लॉन्च करण्यात येणार आहे. नुकताच या अपकमिंग बाईकचा टीजर कंपनीने लॉन्च केला. ही नवीन बाईक फक्त होंडाच्या बिंगबिंग आउटलेटच्या माध्यमातून विक्री करण्यात येणार आहे. या नवीन अपकमिंग  बाईक चे नाव  Honda H’ness CB 350 आहे. टीझरमध्ये कंपनीने CB साठी हॅशटॅग देत माहिती दिली.

   

टीझर

Honda H’ness CB 350 या अपकमिंग बाईकच्या टीजरमध्ये ही बाईक स्प्लिट सीट सेटअप, ग्रॅब रेल आणि स्विचगिअर सह दिसत आहे. या बाईक मध्ये निसीन कॅलिपर सह फ्रंट डिस्क ब्रेक वापरण्यात आल्याचे दिसत आहे. रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 प्रमाणे या नवीन अपकमिंग बाईकचे शॉक ॲबझोर्बर कव्हर करण्यात आले आहे.

स्पेसिफिकेशन

Honda H’ness CB 350 या अपकमिंग बाईक मध्ये 350 CC सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात येऊ शकते. हे इंजिन  5500 RPM वर 21 BHP पावर आणि 3000 RPM वर 30 nm पीक टॉर्क जनरेट करते. ही अपकमिंग बाईक CB350RS समान प्लॅटफॉर्मवर बेस्ड आहे. या बाईकमध्ये देण्यात आलेले इंजिन हे पाच स्पीड गिअरबॉक्स ने सुसज्ज आहे.

किंमत किती?

Honda H’ness CB 350 ही बाईक कंपनी 4 व्हेरिएंटमध्ये लॉन्च करणार आहे. यामध्ये  DLX, DLX PRO, CHROME, लिगेसी एडिशन या व्हेरिएंटचा समावेश असेल. या अपकमिंग बाईकची किंमत 2.10 लाख ते 2.16 लाख रुपये एवढी असेल. ही होंडा कंपनीची बाईक रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ला टक्कर देईल.