टाइम्स मराठी । आज-काल स्मार्टफोन मध्ये इंटरनेटच्या माध्यमातून कंटेंट किंवा मूवी पाहणे अत्यंत पसंत केले जाते. बरेच युजर्स इंटरनेट पॅक मारत असताना मूव्हीज साठी स्पेशली OTT सबस्क्रीप्शन असलेला प्लॅन घेतात, जेणेकरून इंटरनेट सेवे सोबतच चित्रपट पाहता येतील. पण इंटरनेट खर्च न करता तुम्ही मूव्हीज पाहू शकतात का? हो. बिना इंटरनेट मूव्हीज पाहणे आता अत्यंत सोपे आहे. म्हणजेच तुम्ही विदाऊट इंटरनेट देखील बऱ्याच सुविधेचा लाभ घेऊ शकतात. आजकाल सर्वात जास्त प्रमाणात इंटरनेटचा वापर केला जातो. परंतु आता D2M नेटवर्किंग (D2M Technology) सुरू करण्यात येणार आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून विदाऊट इंटरनेट सर्विस मिळेल.
या नेटवर्किंग वर काम सुरू
केंद्रीय दूरसंचार विभाग माहिती आणि प्रसारण मंत्रालय IIT कानपूर यांनी D2M या नेटवर्किंग वर काम सुरू आहे. या नेटवर्किंगच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर कमी होऊ शकतो. यासोबतच आता इंटरनेट शिवाय मोबाईलवर टीव्ही पाहणे या सर्विसच्या माध्यमातून सहज शक्य होईल. यासोबतच आता मोबाईल युजर्सला त्यांच्या मोबाईलवर केबल किंवा DTH कनेक्शन च्या माध्यमातून TV पाहण्याची परवानगी दिली जाणार आहे.
टेलिकॉम कंपनीवर दिसून येईल परिणाम
या टेक्नॉलॉजीला टेलीकॉमर, ऑपरेटर कडून नकार देण्यात येत आहे. कारण या टेक्नॉलॉजी मुळे 5G व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. यासोबतच बऱ्याच अडचणींचा सामना या कंपन्यांना करावा लागू शकतो. या सर्व कंपन्यांचा डेटा रेवेन्यू 80% ट्राफिक व्हिडिओ मध्ये येतो. त्यामुळे जर विदाऊट इंटरनेट D2M नेटवर्किंगच्या माध्यमातून युजर्स चिंत्रपट पाहत असतील तर या कंपन्यांच्या डेटा रेवेन्यू वर प्रभाव पडेल.
काय आहे D2M नेटवर्क- D2M Technology
डायरेक्ट टू मोबाईल म्हणजेच D2M ह्या टेक्नॉलॉजी वर सध्या काम सुरू असुन ही टेक्नॉलॉजी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागेल. D2M ही टेक्नॉलॉजी रेडिओ प्रमाणेच काम करते. D2M टेक्नॉलॉजी चा वापर OTT प्लॅटफॉर्म मल्टीमीडिया कंटेंट प्रदान करण्यासाठी करू शकतात. त्याचबरोबर प्रसार भारती सध्या टीव्ही प्रसारणासाठी 526-582 मेगाहर्टज हा ब्रँड वापरते. हाच ब्रँड मोबाईल आणि ब्रॉडकास्ट या दोन्ही सेवांसाठी या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काम करेल.
हा होईल फायदा
D2M Technology मुळे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना इंटरनेट न वापरता OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मल्टीमीडिया कंटेंट पाहण्याचा चांगला ऑप्शन निर्माण होईल. यामुळे ग्राहकांचा मोबाईल डेटा वरील खर्च देखील कमी होऊ शकतो. एवढेच नाही तर ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांनाही याचा मोठा फायदा होऊ शकतो. ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी इंटरनेट नसल्यामुळे बऱ्याच समस्या येतात. त्यामुळे या नवीन टेक्नॉलॉजीच्या मदतीने ग्रामीण भागात देखील बिना इंटरनेट व्हिडिओ पाहता येईल. एवढेच नाहीतर ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या टेक्नॉलॉजी च्या माध्यमातून अभ्यासासाठी देखील मदत होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज वेगवेगळ्या कृषी पद्धतींची माहिती देखील इंटरनेट शिवाय मिळू शकेल.