Honda ने सादर केली 2024 CBR500R Sport Bike; भारतात कधी होईल लॉन्च?

टाइम्स मराठी । Honda कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या गाड्या लाँच करत असते. भारतीय बाजारपेठेमध्ये होंडा कंपनीचे वाहन मोठ्या संख्येने पसंत केले जातात. आता Honda कंपनीची 2024 CBR500R स्पोर्टबाईक अनविल करण्यात आली आहे. कंपनीने यामध्ये बरेच बदल केले असून अपडेटेड फीचर्स यामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. नवीन अपडेटेड फीचर्स आणि डिझाईन मुळे या बाईकला अप्रतिम लूक मिळाला आहे. होंडा कंपनीने या स्पोर्टबाईक ला 2024 च्या अपडेट सह उपलब्ध केले असून ही बाईक भारतात केव्हा लॉन्च होईल याबद्दल कोणतीच माहिती मिळाली नाही. जाणून घेऊया या बाईकचे स्पेसिफिकेशन आणि अपडेटेड फीचर्स.

   

पावरट्रेन

2024 CBR500R होंडा कंपनीच्या या स्पोर्टबाईक च्या पावरट्रेनमध्ये  कोणतेच बदल करण्यात आलेले नाही. यामध्ये प्यारेलल ट्विन लिक्विड कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. त्यानुसार 471 CC क्षमता असलेले हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्स ने सुसज्ज आहे.  हे इंजिन 47.5 PS पावर देते. आणि 43  nm पीक टॉर्क जनरेट करते. ज्या रायडर ला 500 cc फुल फेयर बाईक खरेदी करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींसाठी  2024 CBR500R हे शानदार मॉडेल आहे.

डिझाईन

2024 CBR500R या स्पोर्ट बाईकच्या डिझाईन मध्ये बदल करण्यात आले आहे. ही बाईक क्लास CBR1000R बाईकने इन्स्पायर्ड आहे. कंपनीने या बाईकच्या मेन साईज मध्ये बदल न करता शार्प फ्रंट फेयरिंग आणि नवीन बॉडीवर्क्स केले आहे. यासोबतच  या बाईकमध्ये अपडेटेड TFT डॅशबोर्ड देण्यात आले आहे. यामध्ये ब्लूटूथ आणि होंडाच्या रोडसिंक टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात आला आहे.

फीचर्स

2024 CBR500R या स्पोर्ट बाईक मध्ये 5 इंच TFT डॅशबोर्ड देण्यात आले आहे. या डॅशबोर्डच्या डाव्या साईडला एक डेडिकेटेड स्विचगिअर देण्यात आले आहे. हे स्विचगिअर TFT च्या माध्यमातून कंट्रोल केले जाऊ शकते. याशिवाय होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल आता स्टॅंडर्ड  पद्धतीने देण्यात आले आहे. एवढेच नाही तर या नवीन अपडेटेड स्पोर्ट बाईक मध्ये  ड्युअल चॅनेल ABS, 17 इंच व्हील, यूएसडी फॉर्क्स, LED लाइटिंग यासारखे बरेच फीचर्स देण्यात आले आहे. कंपनीने या बाईकच्या दोन्ही टायर मध्ये डिस्क ब्रेकचा वापर केला आहे.