टाइम्स मराठी । प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी Hyundai ने आपली Exter भारतीय बाजारात लाँच केली आहे. दमदार फीचर्स आणि आकर्षक लूक असलेली हि गाडी भारतीयांचे मन जिंकेल यात शंकाच नाही. ह्युंदाईची ही कार Tata Punch, Maruti Suzuki Fronx यांसारख्या कंपन्यांना जोरदार टक्कर देईल. कंपनीने Hyundai Xtor च्या बेस व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 5.99 लाख रुपये ठेवली असून टॉप व्हेरिएन्टची किंमत किंमत 9.31 लाख आहे. आज आपण या गाडीचा लूक, खास फीचर्स आणि मायलेज बद्दल सांगणार आहोत.
लूक आणि डिझाईन –
गाडीचा लूक पाहिला तर यामध्ये पॅरामेट्रिक डिझाइन आणि H-आकाराच्या LED DRL सह स्प्लिट हेडलॅम्प सेट-अप दिसतोय. गाडीचे हेडलाईट्स आणि इंडिकेटर नक्कीच तुमचे लक्ष्य वेधून घेईल. यामध्ये तुम्हाला रफ क्लेडिंग, ड्युअल-टोन अलॉय व्हील आणि छतावरील रेलसह फ्लेर्ड व्हील आर्च मिळेल. गाडीच्या पाठीमागील बाजूस अपराईट टेलगेट, टेल लॅम्प आणि एच शेपची एलईडी लाईटिंग देण्यात आली आहे.
इंजिन –
गाडीच्या इंजिनबाबत सांगायचं झाल्यास, Hyundai Xtor मध्ये 1.2-लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे पेट्रोलवर वर्क करत असताना 83 Bhp पॉवर आणि 114 Nm टॉर्क जनरेट करते. तर हेच इंजिन CNG वर चालताना 69 bhp पॉवर आणि 95.2 Nm पीक टॉर्क जनरेट करते . या एसयूव्हीचे पेट्रोल व्हेरिएन्ट 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा एएमटीच्या ऑप्शन सोबत येते. तर सीएनजी व्हेरिएन्ट मध्ये स्टॅंडर्ड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते.
किंमत किती ?
Hyundai Exter SUV EX, S, SX, SX(O) आणि SX(O) Connect या पाच व्हेरिएन्ट लाँच करण्यात आली आहे. व्हेरियेण्ट नुसार, गाडीच्या किमती सुद्धा वेगवेगळ्या आहेत. त्यानुसार, Hyundai Exter EX MT ची किंमत 5,99,900, Hyundai Exter S MT ची किंमत 7,26,900, Hyundai Exter AMT ची किंमत 7,96,980, Hyundai Exter SX ची किंमत 7,99,900, Hyundai Exter CNG ची किंमत 8,23,990 आणि Hyundai Exter SX(O) ची किंमत 8,63,900 रुपये ठेवण्यात आली आहे.