Bullet ला टक्कर देण्यासाठी Rajdoot Bike येतेय नव्या अवतारात; तुमच्याही मनात भरेल

टाइम्स मराठी । Excort आणि Yamaha कंपनीने डेव्हलप केलेली बाईक सलग 30 वर्षांपर्यंत राज्य करत होती. ही बाईक खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील लोक देखील बरेच महिने वाट पाहायचे. वजनाने कमी असलेली आणि नवीन कॉर्बोरेट डिझाईनचा वापर करण्यात आलेल्या या बाईकने सर्व नागरिकांच्या मनात  घर केले होते. या बाईक समोर बुलेट देखील  काहीच नसल्याचे सांगण्यात येतं. तुम्हालाही प्रश्न पडला असेल कोणती आहे ही बाईक? आम्ही तुम्हाला सांगत आहोत राजदूत बाईक बद्दल. या बाईकचं पूर्ण नाव  राजदूत एक्सेल टी होते. एक्सकॉर्ट आणि यामाहा ने डेव्हलप केलेली ही बाईक  मोठ्या प्रमाणात विक्री केली जात होती. आता नवीन डिझाईन आणि टेक्नॉलॉजी च्या माध्यमातून  राजदूत ला डेव्हलप करण्यात येत आहे. म्हणजेच आता ग्राहकांसाठी पुन्हा भारतीय मार्केटमध्ये  राजदूत पदार्पण  करत आहे.

   

मिळालेल्या माहितीनुसार, राजदूत ही बाईक येणाऱ्या पुढील वर्षात लाँच केली जाऊ शकते. लवकरच या बाईकची डिलिव्हरी आणि लॉन्चिंग करण्यात येईल. राजदूत बाईक च्या लॉन्चिंग बद्दल अजून  कोणतीच अधिकारी माहिती मिळाली नसून लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका काळामध्ये रॉयल एनफिल्ड पेक्षाही या राजदूत बाईकची चलती होती. आता पुन्हा पदार्पण करणारी राजदूत बाईक मार्केट मध्ये बुलेटला जोरदार टक्कर देईल. दोन स्ट्रोक इंजिनचा करण्यात आला होता वापर

Excort आणि Yamaha कंपनीच्या राजदूत मध्ये एयर आणि पेट्रोल मिक्स केले जात होते. यामुळे ही बाईक जास्त मायलेज देत होती. त्यावेळी या बाईकमध्ये 173 सीसी इंजिनचा वापर करण्यात आला होता. हे इंजिन दोन स्ट्रोक मध्ये उपलब्ध होते. ही पावरफूल बाईक 70 किलोमीटर पर्यंत मायलेज देण्यास सक्षम होतील. कंपनीच्या या बाईक मध्ये 13 लिटर पेट्रोल टॅंक देण्यात आलेला होता. या बाईकचे चार दशकांपेक्षा जास्त काळ प्रोडक्शन सुरू राहिले.

अशी असेल नवीन बाईक

आता ही अपकमिंग Rajdoot Bike नवीन पद्धतीने डेव्हलप करण्यात येणार आहे. यामध्ये डिझाईन लूक सोबतच इंजिन मध्ये देखील बदल करण्यात येईल. त्यानुसार यामध्ये 250cc 4 स्ट्रोक इंजिन देण्यात येऊ शकते. हे लिक्विड कुल्ड इंजिन असेल.जेणेकरून ही बाईक हाय परफॉर्मन्स देईन.आणि मायलेज देखील वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच बाईक मध्ये अत्यंत लेटेस्ट फीचर्स चा वापर करण्यात येऊ शकतो. त्यानुसार यामध्ये नेविगेशन, डिजिटल डिस्प्ले, ड्राईव्ह एनालिटिक्स, मोबाईल चार्जिंग, स्लीपर क्लच यासारखे फीचर्स मिळतील.