BSNL Whatsapp ChatBot लॉन्च; घरबसल्या बुक करता येणार नवीन कनेक्शन

BSNL Whatsapp ChatBot : भारतामध्ये टेलिकॉम कंपनी म्हणून Jio जिओ आणि Airtel आघाडीवर आहे. या टेलिकॉम कंपन्या युजर्सला अप्रतिम रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. जेणेकरून  कंपन्यांचे युजर्स वाढतील. रिलायन्स जिओ आणि एअरटेल मध्ये सतत प्रतिस्पर्धा बघायला मिळते. आता या प्रतिस्पर्धेमध्ये  BSNL या कंपनीने देखील उडी घेत सध्या कंपनीकडून 4G सेवा ग्राहकांना मिळावी यासाठी टॉवर उभारण्यात येत असून आता ग्राहकांचा एक्सपिरीयन्स अप्रतिम बनवण्यासाठी BSNL कंपनीने नवीन Whatsapp Chatbot सर्विस लॉन्च केली आहे.

   

भारतीय संचार निगम लिमिटेड BSNL कंपनीने whatsapp chatbot सर्विस ही भारत फायबर युजर साठी उपलब्ध केली आहे. या सर्विसच्या माध्यमातून यूजर्सला सरकारी टेलिकॉम कंपनीच्या वेगवेगळ्या सर्विसेस चा फायदा घेता येईल. या सर्विस मध्ये BSNL फायबर कनेक्शन बुक करणे, बिल पेमेंट करणे,  बिल डिटेल्स मिळवणे, तक्रार करणे यासारख्या बऱ्याच सुविधा मिळतात. याबाबत BSNL कंपनीने  ट्विटरच्या माध्यमातून व्हाट्सअप नंबर शेअर करत माहिती दिली आहे.

अशा पद्धतीने करा BSNL Whatsapp ChatBot एक्सेस

BSNL ने भारत फायबर युजर साठी नवीन ऑफिशियल whatsapp chatbot सर्विस लाईव्ह केल्यानंतर यूजर्स ला चॅटच्या माध्यमातून  BSNL कंपनीच्या बऱ्याच सेवेचा लाभ घेण्याबाबत  माहिती दिली आहे. कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट नुसार, या चॅटबॉटचा वापर  करण्यासाठी युजर्स ला  18004444 या नंबर वर hi मेसेज सेंड करावा लागेल. याशिवाय  https://wa.me/18004444 लिंकच्या माध्यमातून चॅटबॉट एक्सेस करता येऊ शकतो.

BSNL whatsapp chatbot मध्ये मिळतील या सुविधा 

BSNL Whatsapp ChatBot एक्सेस मिळवण्यासाठी तुम्ही व्हाट्सअप वर hi पाठवल्यानंतर  तुम्हाला main menu ऑप्शन दिसेल. त्यानंतर तुम्हाला व्ह्यू मेनू या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल. तुमच्यासमोर  BSNL BharatFibere सर्विसेस उघड होतील. या सर्विसेस मध्ये pay bill, view bill, transaction history, book complaint , complaint status, plan change book my fiber  यासारखे ऑप्शन दिसतील. या ऑप्शन पैकी तुम्ही कोणत्याही ऑप्शनचा लाभ घेऊ शकतात. या चॅटबॉटच्या माध्यमातून तुम्ही सहजरीत्या नवीन फायबर कनेक्शन बुक करू शकता.