टाइम्स मराठी । Vivo हा चिनी ब्रँड मार्केटमध्ये वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये स्मार्टफोन लॉन्च करत असतो. आता कंपनीने ग्राहकांसाठी नवीन मोबाईल लॉन्च केला आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनचे नाव Vivo Y12 आहे. कंपनीने हा मोबाईल ऑफिशियल वेबसाईटवर Y सिरीज मध्ये लिस्ट केला असून हा मोबाईल दोन कलर ऑप्शनसह उपलब्ध आहे. कंपनीने हा स्मार्टफोन चिनी मार्केटमध्ये उपलब्ध केला असून भारतामध्ये लॉन्च होणार की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही. जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.
स्पेसिफिकेशन
Vivo Y12 या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच HD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच डिझाईन सह उपलब्ध आहे. हा HD डिस्प्ले 1612×720 पिक्सेल रिझोल्युशन आणि 60 hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. कंपनीने या मोबाईल मध्ये मीडियाटेक HELIO G85 प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर आधारित ओरिजिन OS 3.0 वर चालतो.
कॅमेरा- Vivo Y12
मोबाइलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo Y12 या स्मार्टफोनमध्ये 13 MP प्रायमरी कॅमेरा, 2 MP डेप्थ सेंसर, 8 MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. डेप्थ सेन्सर सोबतच कंपनीने LED फ्लॅश देखील उपलब्ध केला आहे. या मोबाईलमध्ये 5000 MAH बॅटरी देण्यात आली असून, ही बॅटरी 15 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या मोबाईल मध्ये सिक्युरिटी साठी साईड माउंटेन F फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
किंमत किती
Vivo Y12 या मोबाईल मध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. या स्टोरेज मॉडेल ची किंमत 999 युवान म्हणजेच भारतीय चलनानुसार 11,900 रुपये आहे. कंपनीने हा स्मार्टफोन वाइल्ड ग्रीन, क्रिस्टल पर्पल कलर ऑप्शनसह उपलब्ध केला आहे. हा मोबाईल भारतीय बाजारपेठेत केव्हा लॉन्च होईल याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.