टाइम्स मराठी । आजकाल मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या सर्व कामे होतात. ऑफिशियल, पर्सनल कामांसोबतच बँकिंग रिलेटेड कामदेखील आजकाल स्मार्टफोनवरच केले जाते. त्यानुसार भारतामध्ये डिजिटल पेमेंट करण्याकडे नागरिकांचा मोठा कल दिसून येतो. डिजिटल पद्धतीने पेमेंट करण्यासाठी बरेच ॲप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. यामध्ये Google Pay, Phonepe, PayTM सारख्या अँपचा समावेश आहे. यामध्ये गुगल पे चा वापर सर्वात जास्त आहे. तुम्ही सुद्धा गुगल पे च्या माध्यमातून एकमेकांना पैसे पाठवत असाल तर Transaction History डिलीट करायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अशा पद्धतीने करा ट्रांजेक्शन हिस्ट्री डिलीट
1) सर्वात आधी Google Pay ॲप ओपन करा.
2) त्यानंतर प्रोफाइल पिक्चर आयकॉनवर क्लिक करा.
3) या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेटिंग ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
4) सेटिंग वर क्लिक केल्यानंतर प्रायव्हसी अँड सिक्युरिटी या ऑप्शन मध्ये जा.
5) त्यानंतर डेटा अँड पर्सनलायझेशन ऑप्शन वर क्लिक करा.
6) पर्सनलायझेशन ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गुगल अकाउंट लिंक दिसेल. या लिंक वर क्लिक करा.
7) लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन विंडोज स्क्रीन ओपन होईल.
8) नवीन विंडो ओपन झाल्यावर तुम्हाला पेमेंट ट्रांजेक्शन अँड ऍक्टिव्हिटीज ऑप्शन मिळेल.
9) या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली डिलीट ऑप्शन दिसेल.
10) डिलीट ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमची ट्रांजेक्शन हिस्ट्री डेटा डिलीट होईल.
ट्रांजेक्शन हिस्ट्री डिलीट करण्यासाठी वरील प्रोसेस केल्यानंतर, डिलीट ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रांजेक्शन ऍक्टिव्हिटीज डिलीट करण्यासाठी ऑप्शन दिले जातील. या ऑप्शन नुसार तुम्हाला एक तासा पूर्वीची हिस्ट्री, पूर्ण दिवसाची हिस्ट्री अशाप्रकारे ऑप्शन दिले जातील. या ऑप्शन नुसार तुम्ही ट्रांजेक्शन हिस्ट्री डिलीट करू शकता.