Instagram Reels Download : Instagram वर येणार नवीन फिचर; Reels डाऊनलोड करण्यासाठी होईल मदत  

Instagram Reels Download । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वजण सक्रिय असल्याचे दिसतात. Whatsapp, Instagram, Facebook या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बरेच युजर्स आता पैसे कमवायला लागले आहेत. यापूर्वी Instagram प्लॅटफॉर्म वर हातावर मोजण्या एवढे युजर सक्रिय होते. परंतु आता Instagram मध्ये उपलब्ध असलेले रिल्स, स्टोरी पोस्टिंग यामुळे आणि कंपनीने ऍड केलेल्या काही फीचर्स मुळे इंस्टाग्राम चा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. यामध्ये कंपनीकडून बरेच फीचर्स उपलब्ध करण्यात आले असून काही फीचर्स वर काम सुरू आहे. Instagramच्या या फीचर्स मुळे  इंस्टाग्राम वापरण्याचा आणखीनच अप्रतिम अनुभव मिळतो. आता कंपनीने  इंस्टाग्राम मध्ये आणखीन एक फीचर ऍड केले आहे. या फिचरच्या माध्यमातून युजर्स ला  मजेशीर अनुभव मिळेल.

   

Instagram वर कंपनीने रिल्स फीचर उपलब्ध केल्यानंतर यूजर्सची संख्या प्रचंड वाढली. आणि या फीचरच्या माध्यमातून प्रत्येक युजर रिल्स बनवत आहे. परंतु रिल्स डाउनलोड करण्यासाठी बरेच युजर्स दुसऱ्या थर्ड पार्टी ॲप्सचा वापर करतात. आता रिल्स डाउनलोड करण्यासाठी थर्ड पार्टी ॲपची गरज नसून ऑफिशियली इंस्टाग्राम वरूनच युजर्स रिल्स डाउनलोड करू शकतील.

काय आहे हे फीचर– Instagram Reels Download

मेटा कंपनीने इंस्टाग्राम वरील रिल्स डाऊनलोड करण्यासाठी फीचर्स युजर साठी रोलआउट करण्यात येणार असल्याची माहिती दिली. आतापर्यंत युजर्स फक्त पब्लिक प्रोफाईलवर पोस्ट करण्यात आलेले रिल्स डायरेक्ट मेसेज किंवा स्टोरीच्या माध्यमातून शेअर करू शकत होते. पण आता या नवीन फीचरच्या माध्यमातून इंस्टाग्राम युजर्स जगभरात पब्लिक अकाउंट वर पोस्ट करण्यात येणारे रील्स डाऊनलोड करू शकतात. आणि शेअर देखील करू शकतात.

काय म्हणाले instagram चे प्रमुख

या फीचर बाबत instagram चे प्रमुख एडम मोसेरी यांनी ब्रॉडकास्ट चैनल वर घोषणा करत सांगितले की, युजर्स आता पब्लिक अकाउंट च्या माध्यमातून शेअर करत असलेल्या रिल्स डाऊनलोड (Instagram Reels Download) करू शकतात. या रिल्स  मोबाईलच्या गॅलरीमध्ये सेव्ह राहतील. नेटिव डाउनलोड झाल्यानंतर  सर्व instagram रील्स वर क्रियेटर चा instagram हँडल वॉटर मार्क दिसेल. लवकरच हे फीचर्स सर्व युजरसाठी रोल आउट करण्यात येणार आहे.

अशा पद्धतीने करू शकतात रील्स डाउनलोड

instagram रिलीज डाउनलोड करण्यासाठी इंस्टाग्राम वर गेल्यानंतर  तीन डॉट दिसतील. तीन डॉट वर गेल्यानंतर रील्स सेव्ह करता येईल. सेव्ह करण्यात आलेली रिल्स  तुम्ही सेव्ह टॅब वर जाऊन बघू शकतात. जर तुम्ही पब्लिक अकाऊंट वापरत असाल तर, रील्स डाउनलोड करण्यासाठीचे (Instagram Reels Download) ऑप्शन तुम्ही डिफॉल्ट पद्धतीने ऑफ करू शकता. जेणेकरून कोणीच तुमच्या रील्स डाऊनलोड करू शकणार नाही. त्यासाठी प्रोफाइल मध्ये जाऊन  setting and privacy  ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर शेअरिंग add remix  या ऑप्शन वर जा. मध्ये गेल्यानंतर downloading your reals हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर  डाउनलोड बटन टॉगल ऑफ करा.