टाइम्स मराठी । स्मार्टफोन निर्माता कंपनी NUBIA ने नवीन मोबाईल सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीज मध्ये कंपनीकडून 24 GB पर्यंत रॅम आणि 1 TB पर्यंत इंटर्नल स्टोरेज उपलब्ध करण्यात आले आहे. Red Magic 9 Pro आणि Red Magic 9 Pro + दोन्ही मोबाईलचे नाव आहे. हे दोन्ही मोबाईल अप्रतिम डिझाईन आणि फीचर्स मध्ये लाँच कऱण्यात आलेले आहेत. सध्या तरी हा स्मार्टफोन चिनी मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. लवकरच हा मोबाईल भारतीय मार्केटमध्ये देखील येण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.
स्पेसिफिकेशन
Red Magic 9 Pro आणि Red Magic 9 Pro + या दोन्ही स्मार्टफोन मध्ये 6.8 इंच OLED BOE Q9 डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1.5 K रिझोल्युशनसह 120 hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. हा डिस्प्ले 1600 nits पीक ब्राईटनेस आणि अ 2160 hz PWM डिमिंग यासारखे फीचर्स देतो. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये कंपनीने Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर दिला आहे .
कॅमेरा
Red Magic 9 Pro आणि Red Magic 9 Pro + या दोन्ही स्मार्टफोन मध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यानुसार या मोबाईल मध्ये OIS प्रायमरी कॅमेरा 50 MP, अल्ट्रावाईड कॅमेरा 50 MP, मायक्रो कॅमेरा 2 MP, 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळतो. या स्मार्टफोन मध्ये सेक्युरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर उपलब्ध केला आहे.
कनेक्टिव्हिटी फीचर्स
Red Magic 9 Pro आणि Red Magic 9 Pro + या मोबाईल मध्ये 6500 mAh बॅटरी मिळते. ही बॅटरी 165 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये कनेक्टिव्हिटी साठी WIFI , ब्लूटूथ, USB, ऑडिओ जॅक यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स उपलब्ध केले आहे.
किंमत किती?
Red Magic 9 Pro आणि Red Magic 9 Pro + या दोन्ही स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, Red Magic 9 Pro या स्मार्टफोनची किंमत कंपनीने 4399 चिनी युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार, 51,681 रुपये ठेवली आहे. तर Red Magic 9 Pro + या स्मार्टफोनची किंमत 5499 युआन म्हणजेच 65,328 रुपये एवढी आहे.