टाइम्स मराठी । आज-काल मोबाईल आणि इंटरनेट हे व्यक्तींच्या जीवनातील महत्त्वाचे भाग बनले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आज काल बरेच कामे केले जातात. त्यामुळे इंटरनेट शिवाय स्मार्टफोन वापरणारा व्यक्ती राहूच शकणार नाही. असं म्हणणे वावगे ठरणार नाही. तुम्ही स्मार्टफोनचा वापर करत असाल तर WIFI Calling चे नाव नक्कीच ऐकले असेल. कारण आता वायफाय कॉलिंग करणे हे अत्यंत सामान्य झाले आहे. हे फीचर बरेच युजर्स वापरतात. परंतु काहींना अजूनही या फिचर बद्दल माहिती नाही. तर जाणून घेऊया काय आहे हे वायफाय कॉलिंग फीचर.
काय आहे वायफाय कॉलिंग फीचर- WIFI Calling
वायफाय कॉलिंग फीचर च्या माध्यमातून कॉलिंग वेळी तुम्हाला उत्तम दर्जाचा ऑडिओ मिळू शकतो. म्हणजेच ज्या ठिकाणी नेटवर्क कमी आहे , किंवा ज्या ठिकाणी कॉलिंग साठी योग्य नेटवर्क उपलब्ध नाही अशा ठिकाणी या फिचरचा वापर करता येऊ शकतो. नेटवर्क नसलेल्या ठिकाणी WIFI Calling चा अप्रतिम अनुभव मिळतो. आणि या फीचरमुळे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये इतरांसोबत कनेक्ट राहता येऊ शकते.
अशा पद्धतीने करा वायफाय कॉलिंग
WIFI Calling या फिचरचा वापर करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचा अँड्रॉइड मोबाईल वायफाय नेटवर्क सोबत कनेक्ट करावे लागेल.
त्यानंतर तुम्ही मोबाईल सेटिंग मध्ये जा.
किंवा तुम्ही स्मार्टफोन मध्ये उपलब्ध असलेल्या कॉलिंग आयकॉन वर जाऊन वरच्या साईडने देण्यात आलेल्या तीन डॉट वर क्लिक करू शकतात. त्यानंतर सेटिंग ऑप्शन दिसेल.
सेटिंग ऑप्शन मध्ये गेल्यानंतर वायफाय कॉलिंग ऑप्शन दिसेल.
या वाय-फाय कॉलिंग ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर वायफाय कॉलिंग सुरू होईल.
यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन पागल मध्ये टॉर्च आणि नेट बंद करण्याचा ऑप्शन दिसेल.
त्यानंतर तुम्ही वायफाय नेटवर्क झोन मध्ये असाल तेव्हा हे फिचर काम करेल.