टाइम्स मराठी । फनटेक कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी PayTM ने ॲप मध्ये काही बदल केले आहे. त्यानुसार तुम्हाला PayTM ॲपच्या होम पेजवर QR CODE स्कॅनर च्या शेजारी एक ऑप्शन दिसेल. या ऑप्शनच्या माध्यमातून आता PayTM वरून सामान खरेदी करणे सोपे होईल. त्यासाठी कंपनीने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स ONDC हे ऑप्शन यूजर साठी लॉन्च केले आहे. या ऑप्शनच्या माध्यमातून युजर शॉपिंग करू शकतात. सध्या तरी कंपनीने हे फीचर ट्रायल साठी उपलब्ध केले आहे.
ONDC पेज नवीन पद्धतीने केले डेव्हलप
PAYTM चे होम पेजवर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला खाली ONDC ऑप्शन दिसले असेल. या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होते. या पेजवर पेटीएम PAYTM लव ओएनडीसी ONDC तुम्हाला दिसले असेल. आता कंपनीने ONDC या पेजला नवीन पद्धतीने डेव्हलप केले आहे. नवीन डेव्हलप करण्यात आलेल्या या लँडिंग पेज चा लुक पूर्णपणे नवीन आणि अप्रतिम दिसतो. यामध्ये युजर्सला फूड ग्रोसरी इलेक्ट्रॉनिक्स फॅशन यासारख्या बऱ्याच कॅटेगरी दिसतील. या कॅटेगिरीच्या माध्यमातून युजर्स शॉपिंग करू शकतात. यासोबतच शॉपिंग वर त्यांना ऑफर आणि डिस्काउंट देखील देण्यात येणार आहे.
PayTM ठेवत आहे ई-कॉमर्स सेक्टर मध्ये पाऊल
PayTM कंपनीकडून ई-कॉमर्स सेक्टर मध्ये व्यवसाय वाढवत असल्याचे दिसून येते. भारतात ऑनलाईन रिटेल मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या Amazon , Flipkart , Zomato , Swiggy यासारख्या कंपन्यांची पकड तोडण्याचा ONDC चा उद्देश आहे. सध्या मार्केटमध्ये Google pay आणि Phonepe या कंपन्या लीड वर आहेत. आता PayTM देखील ONDC च्या माध्यमातून लाभ मिळवू इच्छित असून लीड करण्याचा प्रयत्न करत आहे.
यापूर्वी देखील PayTM या कंपनीने ई-कॉमर्स मध्ये एन्ट्री केली होती. 2018 च्या सुरुवातीला कंपनीने अलिबाबा आणि सॉफ्ट बँक यासारख्या गुंतवणूक दारांकडून 2 अरब डॉलर पेक्षा जास्त पैसे घेऊन 40 करोड डॉलर जमा केले होते. त्यानंतर 2022 मध्ये अलीबाबा ने 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतींवर कंपनीतील पूर्ण हिस्सा विकला होता.