आता मोबाईलवर खेळता येणार GTA; नेटफ्लिक्सने केली मोठी घोषणा

टाइम्स मराठी । जर तुम्ही Netflix युजर्स असाल तर तुमच्यासाठी हा डिसेंबर महिना खास जाऊ शकतो. कारण कंपनी डिसेंबर महिन्यात गेम्स लवर्स साठी मोठं गिफ्ट देणार आहे. नुकतेच नेटफ्लिक्स कंपनीने गेमिंग झोनबाबत मोठी घोषणा केली असून आता चक्क नेटफ्लिक्स गेम्सवर ग्रँड थ्रेफ्ट ऑटो म्हणजेच GTA गेम्स खेळता येणार आहे. यापूर्वी तुम्ही GTA VICE CITY हा व्हिडिओ गेम्स खेळले असाल. या गेम्सचे तीन भाग नेटफ्लिक्सवर उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी कंपनीने रॉकस्टार गेम्स सोबत करार  केला आहे.

   

या बाबत Netflix कंपनीने ट्विटरवर माहिती देत 14 डिसेंबर पासून ग्रँड थ्रेप्ट ऑटो सिरीज मधील GTA 3, Vice City आणि San Andreas हे तीन गेम्स मोबाईल नेटफ्लिक्स गेम्स वर खेळता येणार असल्याचे सांगितलं. हे तिन्ही गेम्स नेटफ्लिक्स सबस्क्रीप्शन असणाऱ्या युजरला फ्री मध्ये खेळता येणार आहे. यासाठी आजपासूनच गेमर्सios, गुगल प्ले स्टोअरवर गेम खेळण्यासाठी प्री रजिस्ट्रेशन करू शकतात. हे गेम्स ग्राहकांसाठी नेटफ्लिक्स मोबाईल ॲप मध्ये ॲप स्टोअर आणि गुगल प्ले वर स्पेशली उपलब्ध करण्यात येणार आहे.

नेटफ्लिक्सने गेमिंग सर्व्हिस बनवण्यासाठी जवळपास अरब डॉलर खर्च केले आहे. कंपनी आता 400 स्टाफ सदस्यांना या टीममध्ये सहभागी करण्यासाठी अनेक गेम एक्झिक्युटिव्हची नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. हे एक्झिक्युटिव्ह AAA शीर्षकाच्या विकासावर काम करतील. आणि या शीर्षकाच्या किमती करोडो डॉलर  पर्यंत असू शकतात.

नेटफ्लिक्स गेम मध्ये 80 पेक्षा जास्त गेमिंग शीर्षकची लायब्ररी दिसेल. यामध्ये कंपनीने जास्तीत जास्त गेमर्सला आकर्षित करण्याचे ध्येय निश्चित करण्यासोबतच काही मोठी नावे जोडण्याचे देखील काम सुरू केले आहे. यामध्ये डेड सेल्स, स्पिरिटफेयरर, इम्मोर्टेलीटी आणि केंटुकी रूट झिरो यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर कंपनी लोकप्रिय टीव्ही शो मनी हिस्ट, शाडो अँड बोन : एंटर द फोल्ड आणि द ड्रॅगन प्रिन्स  यावर आधारित शीर्षक देखील जोडत आहे.