टाइम्स मराठी । BMW कंपनीच्या बाईक्समध्ये कम्फर्टेबल आणि पावरफुल इंजिन देण्यात येते. आता कंपनीने मार्केटमध्ये नवीन हॉलीवुड स्टाईल बाईक लॉन्च केली आहे. या नवीन बाईकचं नाव R12 nineT Roadster आहे. कंपनीने लॉन्च केलेली ही बाईक तीन रायडींग मोड मध्ये उपलब्ध आहे. या बाईकमध्ये बरेच अप्रतिम फीचर्स देण्यात आलेले असून ही बाईक 19.02 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीमध्ये लॉन्च करण्यात आली. कंपनीने ही बाईक ग्लोबली लॉन्च केली असून लवकरच भारतात देखील लॉन्च करण्यात येणार आहे. जाणून घेऊया या बाईकचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.
स्पेसिफिकेशन
BMW R12 nineT Roadster या बाईकमध्ये 1170cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन बॉक्सर ट्वीन इंजिन असून लॉंग रूटवर हाय परफॉर्मन्स देते. त्याचबरोबर हे इंजिन 109 BHP पावर जनरेट करते. या इंजिन सोबत सहा स्पीड गिअरबॉक्स सुसज्ज करण्यात आले आहे. कंपनीने या बाईकमध्ये लांबच्या प्रवासासाठी 16 लिटर फ्युल टॅंक उपलब्ध केला आहे. तसेच बाईकमध्ये डिस्क ब्रेक सोबतच स्टायलिश एक्झॉस्ट देखील दिले आहेत.
फिचर्स
R12 nineT Roadster या बाईक मध्ये इंजिन ब्रेक कंट्रोल आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम यासारखे ऍडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहे. त्याचबरोबर अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम देखील यामध्ये उपलब्ध आहे. या बाईक मध्ये 17 इंच मोठे व्हिल्स देण्यात आले असून यामध्ये देण्यात आलेली ब्रेकिंग सिस्टीम दोन्ही टायर कंट्रोल करते. या बाईकमध्ये LED लाईट्स उपलब्ध करण्यात आले आहे.