टाइम्स मराठी । तुम्ही सध्या जर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि Volkswagen कार खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल तर तुमच्यासाठी हा खास चान्स आहे. कारण प्रसिद्ध का निर्माता कंपनी Volkswagen काही कार मॉडेलवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर करत आहे. या डिस्काउंट ऑफरच्या माध्यमातून तुम्ही कमी किमतीमध्ये मॉडेल खरेदी करू शकतात. Volkswagen कंपनी सिक्युअर कार डेव्हलप करते. जर तुम्ही देखील तुमचा प्रवास सोयीस्कर आणि सुरक्षित करू इच्छित असाल तर Volkswagen कंपनीच्या कार तुमच्यासाठी बेस्ट आहेत. या कंपनीच्या कार मध्ये सेफ्टी फीचर्स कडे मोठ्या प्रमाणात भर दिले जाते. जाणून घेऊया कंपनी देत असलेले डिस्काउंट ऑफर्स.
Volkswagen Virtus –
VOLKSWAGEN कंपनी वर्ट्स या मॉडेलवर डिस्काउंट ऑफर देत आहे. या सिडान कार वर कंपनी 1.13 लाख रुपयांचा डिस्काउंट देत आहे. मागच्या महिन्यापेक्षा 33 टक्के जास्त डिस्काउंट कंपनीकडून या कारवर मिळत आहे. त्यानुसार तुम्ही ही कार कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. या कारमध्ये सेफ्टी साठी सहा एअर बॅग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, सनरूफ , वायरलेस चार्जिंग, ABS, EBD, ECS यासारखे फीचर्स मिळतात. याशिवाय 10 इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम, रियर पार्किंग सेंसर, रियर पार्किंग कॅमेरा, चाइल्ड लॉक, एम्बीएन्ट लाइटिंग, 8 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, चाइल्ड आयसोफिक्स सीट, यासारखे फीचर्स देखील मिळतात.
Volkswagen Taigun–
VOLKSWAGEN कंपनीच्या टाइगन या मॉडेल वर कंपनी 1.46 लाख रुपयांचा बंपर डिस्काउंट ऑफर करत आहे. त्यानुसार तुम्ही ही कार कमी किमतीत खरेदी करू शकतात. सध्या तरी या मॉडेलची किंमत 11.62 लाख रुपयांपासून सुरू होते. यामध्ये सेफ्टी साठी 6 एअरबॅग देण्यात आले आहेत. यासोबतच पार्क डिस्टन्स कंट्रोल, मल्टी टक्कर ब्रेक, ऑटो हिल होल्ड कंट्रोल, रियर व्ह्यू कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि 3 पॉईंट सीट बेल्ट यामध्ये मिळतात.
Volkswagen Tiguan-
VOLKSWAGEN कंपनीच्या टीगूआर SUV या मॉडेलवर कंपनीकडून 4.20 लाख रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. या मॉडेलमध्ये एलईडी मॅट्रिक्स हेडलॅम्प, थ्री झोन क्लायमेट कंट्रोल, 18 इंच सेब्रिग स्टर्लिंग सिल्वर अलॉय व्हील्स, हिल स्टार्ट असिस्ट, ड्राइव्हर अलर्ट सिस्टीम, ॲल्युमिनियम पेंडल आणि डायनामिक हबकॅप, पॅनोरमिक सनरुफ, 6 एयरबॅग, एम्बीएंट लाइटिंग यासारखे फीचर्स मिळतात.