Kawasaki ने लाँच केली W175 Street बाईक; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । गोवामध्ये सुरू असलेल्या इंडिया बाईक वीक 2023 मध्ये Kawasaki कंपनीने नवीन बाईक लॉन्च केली आहे. ही लॉन्च करण्यात आलेली बाईक मेड इन इंडिया असून यामध्ये वेगवेगळे फीचर्स आणि बदल बघायला दिसून येतात. या नवीन लॉन्च करण्यात येणाऱ्या बाईकचे नाव Kawasaki W175 Street आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत 1.35 लाख रुपये एवढी आहे. यामध्ये नवीन कलर ऑप्शन कंपनीने उपलब्ध केले आहे. ही बाईक याच महिन्यापासून डिलिव्हर करण्यात येणार आहे. जाणून घेऊया या बाईकचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

 डिझाईन आणि फीचर्स

Kawasaki W175 Street या बाईकमध्ये दोन नवीन कलर्स मिळतात. यामध्ये कँडी एमराल्ड ग्रीन आणि मेटॅलिक मूनडस्ट ग्रे हे कलर  देण्यात आले आहे. ही बाईक साकी W175 स्ट्रीट सेमी डबल फ्रेम वर बेस्ड आहे. या बाईकमध्ये क्रोम बेजल सह एक गोलाकार मल्टी रिफ्लेटेड हेडलॅम्प मिळतो. यासोबतच  या बाईकला स्ट्रीट रेट्रो थीम वाल्या सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ने सुसज्ज करण्यात आले आहे. यासोबतच बाईकच्या फ्युअल टॅंक वर आकर्षक ग्राफिक्स देण्यात आले आहे.

 ग्राउंड क्लिअरन्स

Kawasaki W175 Street या बाईकच्या सीट ची उंची 786.5 mm एवढी असून ग्राउंड क्लिअरन्स 182 mm आहे. या बाईकमध्ये 17 इंच अलोय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहे. या बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीम बद्दल बोलायचं झालं तर, बाईकच्या फ्रंट मध्ये 245 mm डिस्क ब्रेक सह ड्युएल चॅनेल  ABS मिळते. यासोबतच सस्पेन्शन ड्युटी साठी या बाईकच्या फ्रंट मध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स, ट्वीन रियर शॉक एक्झॉर्बर मिळतो. 

 स्पेसिफिकेशन

Kawasaki W175 Street मध्ये 177cc सिंगल सिलेंडर, एयर कुल्ड, फ्यूएल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7000 RPM वर 12.7 HP मॅक्झिमम पावर आणि 6000 RPM वर 13.2 nm पिक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन पाच स्पीड गिअरबॉक्स ने सुसज्ज करण्यात आले आहे. ही बाईक रॉयल एनफिल्ड हँटर 350, बजाज अवेंजर क्रूज 220, TVS रोनिन 225 या बाईक सोबत प्रतिस्पर्धा करते.