महासागरातील पाण्याचा रंग का बदलतोय? संशोधनातून कारण झाले स्पष्ट

टाइम्स मराठी । पाण्याचा रंग नेमका कोणता असेल हे जर आपल्याला कोणी विचारलं तर आपण सहजच उत्तर देतो की, पाण्याचा कोणताच रंग नसतो. पाणी ज्यामध्ये मिसळलं त्या रंगाचं होऊन जातं. त्याचप्रमाणे आपण जेव्हा समुद्राच्या ठिकाणी जातो त्यावेळी आपल्याला समुद्राचा रंग निळा आणि मध्येच हिरवा असल्याचं जाणवतं. गेल्या काही वर्षांपासून महासागराच्या पाण्याचा रंग बदलत असल्याचं दिसत आहे. नेमकं हे कशामुळे होत असेल यावर शास्त्रज्ञ बऱ्याच वर्षापासून संशोधन करत आहेत.

   

युकेच्या साऊथँम्प्टन येथील नॅशनल ओशनोग्राफी सेंटर या ठिकाणी असलेल्या महासागर आणि हवामान शास्त्रज्ञ बीबी कैल यांच्या नेतृत्वाखाली टीमने अभ्यास केला. आणि फर्स्ट पोस्ट वृत्तानुसार, आम्ही बऱ्याच महासागराच्या पाण्याची तपासणी केली. त्यावेळी रंगांमध्ये बदल आढळले. त्याचबरोबर महासागराच्या या रंगाने जमिनीच्या हिस्स्यापेक्षाही जास्त समुद्रिक क्षेत्र व्यापले आहे.

आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सी एएफपी यांच्या रिपोर्टनुसार काही दशकांपासून महासागरातील रंग परिवर्तन दिसत आहे. संशोधनातून असे दिसत आहे की उष्णकटिबंधीय एरियामध्ये थोडा मोठ्या प्रमाणात हिरवळ दिसणे हे जगातील सागरी जीवनावर हवामान बदलाचा परिणामामुळे आहे. हा परिणाम जमिनीच्या भागापेक्षाही जास्त समुद्री क्षेत्रांमध्ये बघायला मिळत आहे. खास करून इकोसिस्टम आणि प्लॅक्टन मध्ये झालेले बदलाव यामुळे देखील समुद्राच्या पाण्यामध्ये रंगांच्या बदलावर दिसत आहे. हे प्लॅक्टन समुद्री अन्नसाखळी चा आधार असून वातावरण स्थिर ठेवण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.

बीबी कैल आणि त्यांच्या टीमने केलेल्या रिसर्चनुसार, महासागरातील पाण्याचा रंग हे चिंताजनक आहे. कारण रंग हे परिसंस्थेची स्थिती दाखवतात. म्हणजेच पाण्याच्या रंगात होणारे बदल हे परिसंस्थेच्या स्थितीत काही बदलाव होत आहेत. जर महासागराच्या समुद्रातील पाण्याचा रंग निळा असेल तर त्या ठिकाणी जीवनाची शक्यता कमी होत आहे. पण जर पाण्याचा रंग हिरवा आहे तर यामध्ये जास्त गतिविधि असण्याची शक्यता आहे. खास करून प्रकाश संश्लेषण करणारी फ्लाईटोप्लांकटन. ज्यामध्ये झाडांसारखी हिरवी क्लोरोफिल असते.

फ्लाईटोप्लांकटन हे ऑक्सीजन उत्पादन करत असतात. जागतिक कार्बन चक्र आणि सागरी अन्नसाखळीचा हा त्याचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. ज्या ठिकाणी फ्लाईटोप्लांकटन कमी असेल त्या ठिकाणी पाण्याचा रंग हिरवा होणार नाही. म्हणजेच या ठिकाणी जीवाची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर जर क्लोरोफिल कमी असेल तर ऑक्सिजनचे प्रमाण देखील कमी होत असल्याचं दिसून येते आणि याचा परिणाम सागरी जीवनावर जास्त होतो