TVS Apache RTR 160 4V : भारतातील सर्वात लोकप्रिय टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी TVS कंपनी भारतात वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये वाहन लॉन्च करत असते. खास करून ग्राहकांना TVS ची TVS APACHE बाईक जास्त पसंत आहे. त्यामुळे कंपनीने सुद्धा आता APACHE लाईनअप वाढवण्यासाठी याच सेगमेंट मध्ये नवीन बाईक लॉन्च केली आहे.TVS Apache RTR 160 4V असेया बाईकचे नाव असून आज आपण या गाडीचे खास फीचर्स आणि तिच्या किमतीबाबत जाणून घेणार आहोत.
इंजिन
TVS Apache RTR 160 4V या बाईक मध्ये 160 cc सिंगल-सिलेंडर, एयर/ऑईल-कूल्ड इंजन देण्यात आले आहे. हे इंजिन 5-स्पीड गियरबॉक्सला जोडण्यात आले असून 17.35 hp पावर आणि 14.73 Nm पीक टॉर्क जनरेट करते. TVS ची हि बाईक प्रतितास 114 किलोमीटर टॉप स्पीड देते. या स्पोर्ट बाईकच्या लुक मध्ये कोणतेच बदल करण्यात आलेले नाही. कंपनीने या बाईकमध्ये तीन रायडिंग मोड उपलब्ध केले आहे. यामध्ये अर्बन, रेन आणि स्पोर्ट मोडचा समावेश आहे.
फिचर्स– TVS Apache RTR 160 4V
गाडीच्या फीचर्स बद्दल सांगायचं झाल्यास, TVS Apache RTR 160 4V मध्ये 240 mm मोठी रियर डिस्क, फ्रंट मध्ये टेलीस्कोपिक फोर्क आणि रियर मध्ये मोनोशॉक यूनिट देण्यात आले आहे. यासोबतच बाईक मध्ये व्हॉईस असिस्ट, स्टैंडर्ड स्मार्टएक्सोनेक्ट फीचर, टर्न-बाय-टर्न नेविगेशन, कॉल/एसएमएस अलर्ट आणि कॅश अलर्ट सिस्टम यासारखे ऍडव्हान्स फीचर्स देखील मिळतात.
किंमत किती?
कंपनीने TVS Apache RTR 160 4V या बाईकची एक्स शोरूम किंमत 1.35 लाख रुपये एवढी ठेवली असून या बाईक मध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहे. बाजारात ही स्पोर्ट बाईक Hero Extreme 160 R 4V, Bajaj Pulsar NS 160 या बाईकला जोरदार टक्कर देईल.