नाद खुळा!! LG ने लाँच केलाय Robot; करतो घरातील सर्व कामे

टाइम्स मराठी । सध्या तंत्रज्ञानाचे युग असून रोज काही ना काही नवं आणि अपडेटेड गोष्टी आपल्याला पाहायला मिळतं. यावर्षी आपण AI चाटबोट याबद्दल ऐकलं असेलच. आता याच AI च्या मदतीने प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी LG ने एक नवा रोबोट लाँच केला आहे. हा रोबोट तुमच्या घरातील सर्व कामे अगदी आरामात करू शकतो. त्यामुळे साहजिकच माणसाला आराम मिळणार आहे.

   

LG चा हा रोबोट AI चा वापर करून नव्या गोष्टी शिकू शकतो. लोक काय म्हणतात हे सुद्धा या रोबोटला समजते. माणसाचा आवाज आणि चेहरा हा रोबोट ओळखू शकतो. या रोबोटला दोन पाय आहेत, ज्यामध्ये लहान चाके बसवली आहेत. या चाकांच्या मदतीने हा रोबोट इकडे तिकडे फिरू शकतो तसेच फुगलेल्या पायांच्या सांध्याद्वारे भावना व्यक्त करू शकतो. कंपनीच्या असं म्हणणं आहे कि, मल्टी -मॉडल एआय तंत्रज्ञान, व्हॉइस आणि इमेज रेकग्निशनसह नैसर्गिक भाषा प्रक्रियेद्वारे हा रोबोट सर्व गोष्टी समजून घेतो.

पाळीव प्राणी घरात असणाऱ्यांसाठी फायदेशीर

तुमच्या घरात जर कोणता पाळीव प्राणी असेल तर हा रोबोट तुमच्यासाठी चांगलाच फायदेशीर ठरेल. कारण रोबोट पाळीव प्राण्यांचे निरीक्षण करू शकतो. आणि तुमच्या घराच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवू शकतो. या रोबोटच्या मदतीने अगदी लांबूनच तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्याचे निरीक्षण करू शकता आणि काही चुका असतील तर हा रोबोट तुम्हाला त्याबाबत लगेच अलर्ट सुद्धा करतो.

जेव्हा तुम्ही घरी नसाल तेव्हा हा रोबोट तुमच्या घरातील दारे- खिडक्या सुरु आहेत कि बंद आहेत हे पाहतो. तसेच घरातील पंखा, टीव्ही चालू असल्यास बंद करून तुमची अतिरिक्त वीज सुद्धा वाचवेल. जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा हा रोबोट तुमचा मूड ओळखेल आणि तुमचं स्वागतही करेल. एकूणच काय तर हा रोबोट तुमच्या घराला हसत खेळत ठेवण्यास चांगली मदत करेल.