टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Honor ने आपला Honor X50 Pro स्मार्टफोन चीनमध्ये लाँच कऱण्यात आलाय. या मोबाईल मध्ये 108MP कॅमेरासह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनी हा मोबाईल ऑनलाईन विक्री करणार नाही तर ग्राहकांना थेट Honor स्टोअर मधून ते खरेदी करावा लागणार आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत जाणून घेणार आहोत.
6.78 इंचाचा डिस्प्ले –
Honor X50 Pro मध्ये कंपनीने 120Hz रिफ्रेश रेट सह 6.78 इंचाचा कर्व्ह OLED डिस्प्ले दिला आहे. यामध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला असून हा Android 13 OS वर चालतो. Honor च्या या स्मार्टफोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुविधाही देण्यात आली आहे. दिसायला हा मोबाईल अतिशय स्लिम असून वजनाने सुद्धा हलकाफुलका असून त्याचे वजन 192 ग्राम आहे.
कॅमेरा –
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Honor X50 Pro मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 108MP चा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.कंपनीने या मोबाईल मध्ये 5800mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 35W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती?
Honor X50 Pro स्मार्टफोन दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे: यामध्ये हिरवा आणि काळा या रंगांचा समावेश आहे. कंपनीने हा मोबाईल 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये लाँच केला असून त्याची किंमत 2,799 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 35,367 रुपये आहे.