टाइम्स मराठी । सध्या मोबाईलचे वेड सर्वानाच आहे. दररोज नवनवीन आणि अपडेटेड फीचर्स सह अनेक कंपन्या मोबाईल आणत असतात. परंतु मोबाईल मध्ये जितके जास्त फीचर्स असतात तितक्याच त्याच्या किमती सुद्धा जास्त असतात. त्यामुळे अनेकांना मोबाईल खरेदी करणं परवडत नाही. परंतु तुम्ही जर स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करणार असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी 6000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील मोबाईल घेऊन आलो आहोत. Tecno Pop 8 असे या मोबाईल चे नाव असून यामध्ये अनेक खास फीचर्स सुद्धा देण्यात आले आहेत.
Tecno Pop 8 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट सह 6.56 इंचाचा HD + डॉट-इन IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये Unisoc T606 ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. यासोबतच मोबाईलला Mali-G57 MP1 जीपीयू सपोर्ट सुद्धा मिळतो. Tecno च्या या मोबाईल मध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज दिले आहे. 4GB ची हि रॅम वर्चुअल पद्धतीने आणखी 4GB पर्यंत वाढवता येते.
कॅमेरा- Tecno Pop 8
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, या फोनमध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये 12MP ड्युअल AI रियर कॅमेरा आणि 8MP AI सेल्फी कॅमेरा देण्यात आलाय. Tecno Pop 8 मध्ये 5000Mah बॅटरी मिळत असून हि बॅटरी 10W चार्जरला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी या मोबाईल मध्ये 4G VoLTE, Wi-Fi 802.11, Bluetooth 5.0, GPS, USB Type C सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. तर रक्षेसाठी, यात साइड माउंटेड फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा देण्यात आले आहे.
किंमत किती?
Tecno Pop 8 हा मोबाईल 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सपोर्टसह येतो. या स्मार्टफोनची लिस्ट प्राइस 6,499 रुपये आहे, परंतु तो 5,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. तुम्हाला हा मोबाईल काळ्या आणि पांढऱ्या अशा २ रंगात खरेदी करत येईल. येत्या 9 जानेवारीला दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल .