Astrology : गजकेसरी योगाचा प्रभाव!! वृषभसह ‘या’ 5 राशींना होणार धनलाभ

टाइम्स मराठी । जोतिष्यशास्त्रानुसार (Astrology) , आज म्हणजेच 11 जुलै रोजी सिंह राशीनंतर चंद्र कन्या राशीत जाणार आहे. तसेच उद्या आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असल्याने या दिवशी गजकेसरी योग (Gajkesari Yog) , रवियोग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा शुभ संयोग होत आहे. या सर्व शुभ योगामुळे वृषभ राशींसह इतर 5 राशींच्या लोकांना मोठा लाभ होणार आहे. या राशींच्या लोकांना कामात बढती मिळण्याची शक्यता असून रखडलेली कामे सुद्धा मार्गी लागतील. एवढच नव्हे तर पैशाच्या बाबतीत सुद्धा तुमची चांदी होणार आहे. चला तर जाणून घेऊया या ५ राशी नेमक्या आहेत तरी कोणत्या.

   

1) वृषभ –

११ जुलै हा दिवस वृषभ राशीसाठी चांगला असणार आहे. ज्याठिकाणी तुम्ही नोकरी करता त्याठिकाणी तुमचं कौतुक होईल तसेच बढती मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तिथेही तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक संबंध आणखी सुधारतील तसेच भावंडांची साथ तुम्हाला मिळेल. तुमची जी काही कामे रखडली असतील ती आज मार्गी लागू शकतात.

2) कर्क – Astrology 

कर्क राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा ११ जुलैला पूर्ण होतील. नोकरदार वर्गाला दुसऱ्या कंपन्यांकडून चांगल्या ऑफर मिळतील. जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर त्याठिकाणी चांगला रिटर्न तुम्हाला मिळेल. समाजातील बड्या व्यक्तींशी तुमचे संबंध सुधारतील. प्रियकर किंवा प्रेयसीसोबत बाहेर कुठेतरी फिरायला किंवा जेवायला जाण्याचा योग आज जमू शकतो.

3) तूळ –

गजकेसरी योगामुळे (Astrology )तूळ राशीच्या लोकांना आर्थिक बळ मिळणार आहे. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. समाजात तुमचा मान- सन्मान वाढेल आणि कौटुंबिक समस्यांपासून मुक्ती सुद्धा मिळेल. जर तुम्ही कोणता व्यवसाय करत असाल तर त्याठिकाणी चांगला फायदा मिळेल. कौटुंबिक संबंध सुधारतील आणि सर्वांसोबत खेळीमेळीचे वातावरण राहील. बड्या लोकांच्या ओळखीमुळे तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील.

4) मकर –

मकर राशीच्या लोकांना 11 जुलै हा दिवस लाभदायक ठरणार आहे. नोकरी आणि व्यावसायिकांचे पद आणि प्रतिष्ठा उद्या वाढेल आणि उत्पन्न वाढीचे नवीन मार्ग सुद्धा सापडतील . आज तुम्ही कुठे पैशाची गुंतवणूक केली तर भविष्यात तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमच्या राहणीमानात सुधारणा होण्याची शक्यता आहे तसेच विवाहासाठी इच्छुक असाल तर आज चांगली स्थळे सुद्धा तुम्हाला येतील.

5) कुंभ –

आजचा 11 जुलैचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी आनंदाचा दिवस असणार आहे. तुम्ही घराशी संबंधित काम जसे की घराचे नूतनीकरण, मालमत्ता खरेदी इत्यादींमध्ये गुंतवणूक करू शकता आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला आजचा दिवस अनुकूल असा राहील. मित्रांची साथ मिळेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांची साथ आणि पाठबळ तुम्हाला मिळेल.

टीप: ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे, ज्योतिष आणि धर्माचे उपाय आणि सल्ले तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ठरवा.