टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Honor ने चिनी बाजारात आपला नवा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. Honor Magic Vs 3 असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी यांसारखे अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. मोबाईलचा लूक सुद्धा अतिशय आकर्षक असून सर्वानाच भुरळ पाडणारा आहे. आज आपण Honor च्या या फोल्डेबल स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि त्याची किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…
7.92-इंचाचा डिस्प्ले-
Honor Magic Vs 3 मध्ये 7.92-इंचाचा OLED डिस्प्ले आहे तर मोबाईलचा कव्हर डिस्प्ले 6.43-इंचाचा आहे. या दोन्ही स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटसह येतात. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर बसवण्यात आला असून हा मोबाईल Android 14 वर आधारित Magic OS 8.0.1 वर काम करतो. Honor चा हा मोबाईल 12GB RAM + 256GB, 12GB RAM + 512GB आणि 16GB RAM + 1TB स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.
कॅमेरा सेटअप-
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Honor Magic Vs 3 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 40MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 8MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 16MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 66W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती? Honor Magic Vs 3
कंपनीने सध्या हा फोन चीनमध्ये लॉन्च केला आहे. त्याच्या 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,999 युआन (अंदाजे 80 हजार रुपये) आहे. 12GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 7699 युआन (सुमारे 88 हजार रुपये) आहे. तर 16GB RAM + 1TB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 8,699 युआन (अंदाजे 1 लाख रुपये) आहे. भारतात हा मोबाईल कधी लाँच होईल याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.