Suzuki Avenis 2024 : Suzuki ने अपडेटेड फीचर्ससह लाँच केली स्कुटर; TVS, Honda ला देणार टक्कर

टाइम्स मराठी । पावरफुल बाईक बनवणारी कंपनी सुझुकीने भारतीय बाजारात Suzuki Avenis 2024 अपडेटेड फिचर सह लाँच केली आहे. 125 cc स्कूटर सेगमेंटमध्ये हि स्कुटर लाँच करण्यात आली असून ग्राहकांसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. स्कुटरचा लूक सध्या आकर्षक असून युवा आणि तरुणांना या स्कुटरची नक्कीच भुरळ पडेल. तुम्ही हि स्कुटर पर्ल मीरा रेड आणि ग्लॉसी स्पार्कल ब्लॅक रंगात खरेदी करू शकाल. भारतीय बाजारात सुझुकीची हि स्कुटर बजाज, TVS, होंडा आणि हिरोच्या गाडयांना टक्कर देईल.

   

इंजिन– Suzuki Avenis 2024

कंपनीने या स्कूटरच्या 2024 मॉडेलच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. नवीन Suzuki Avenis स्कूटरमध्ये 4-स्ट्रोक सिंगल-सिलेंडर 124.3 cc BS6 इंजिन बसवण्यात आलं आहे. हे इंजिन 6750 rpm वर 8.7 PS पॉवर आणि 5500 rpm वर 10 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. सुझुकी इको परफॉर्मन्स (SEP) आणि इंजिनमधील अपडेटेड फ्युएल इंजेक्शन टेक्नॉलॉजी टॉप क्लास पॉवर, कार्यक्षमता आणि इंधनाचा कमी वापर याची खात्री देते, ज्यामुळे चालवणाऱ्यासाठी हि स्कुटर एक चांगला पर्याय आहे. सुझुकीच्या या स्कूटरच्या पुढील बाजूस 12 इंच रिम आणि मागील बाजूस 10 इंच रिम आहे. याशिवाय, कंपनीने समोर डिस्क ब्रेक सेटअप आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक सेटअप वापरला आहे. गाडीच्या सीटखाली 21.8 लिटरची मोठी स्टोरेज स्पेस

फीचर्स

नवीन सुझुकी एवेनिसमध्ये (Suzuki Avenis 2024) इंटिग्रेटेड इंजिन स्टार्ट आणि किल स्विच, सुझुकी इझी स्टार्ट सिस्टम, साइड स्टँड इंजिन कटऑफ, एकत्रित ब्रेक सिस्टम, टेलिस्कोपिक सस्पेंशन सेट-अप, फ्रंट फोर्क सस्पेन्शन यांसारखे फीचर्स आहेत. यामध्ये स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल डिस्प्ले आहे जो Android आणि Apple दोन्ही मॉडेल्सशी जोडलं जाते. स्कुटरच्या डिस्प्लेवर टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्ट मिळतील. आजकाल मोबाईल हा अतिशय गरजेचा बनला असून लांबच्या पल्ल्याचा प्रवास करताना मोबाईल बंद पडू नये यासाठी या स्कूटरमध्ये एक यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करू शकता