Motorola edge 50 भारतात लाँच!! पडला तरी फुटणार नाही, पाण्याचेही नो टेन्शन

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । आघाडीची मोबाईल निर्माता कंपनी Motorola ने Motorola edge 50 नावाचा नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा मोबाईल 8GB RAM , 50MP सह अनेक दमदार फीचर्सने सुसज्ज आहे. एव्हढच नव्हे तर कंपनीने हा मोबाईल इतका मजबूत बनवला आहे कि वरून पडला तरी फुटणार नाही, आणि पाण्यात पडला तरी टेन्शन नाही. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

   

Motorola edge 50 मध्ये 120 Hz रीफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा poOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले 1200 nits पिक ब्राईटनेसला सपोर्ट करत असून त्याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे संरक्षण आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जनरल 1 एक्सेलरेटेड एडिशन प्रोसेसर बसवला असून यात 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे. मोटोचा हा मोबाईल अतिशय स्लिम असला तरी खूप मजबूत आहे. कोणत्याही टेम्परेचरचा आणि धुळीचा या स्मार्टफोनला धोका नाही आणि पाण्यात सुद्धा तो चालू शकतो. हा स्मार्टफोन Android 14 वर काम करतो.

कॅमेरा – Motorola edge 50

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Motorola edge 50 मध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 13MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 10 MP टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32 MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 68W टर्बोपॉवर चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोनला IP68 रेटिंग मिळाले आहे, जे डिव्हाइसला पाण्यापासून आणि धुळीपासून मोठ्या प्रमाणात संरक्षित करू शकते. \

किंमत किती ?

Motorola edge 50 हा स्मार्टफोन 27,999 रुपयांत लाँच करण्यात आला आहे. तुम्ही जर Axis Bank आणि IDFC First Bank च्या क्रेडिट कार्डचा वापर करून मोबाईल खरेदी केल्यास तुम्हाला 2,000 रुपयांची सूट दिली जाईल. यामुळे मोबाईलची किंमत 25,999 रुपये होईल.