WhatsApp चे जबरदस्त फीचर्स; आता हव्या त्या व्यक्तींनाच दिसेल DP

टाइम्स मराठी । WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जगभरात व्हाट्सअपचे करोडो यूजर्स आहेत. आपल्या वापरकर्त्यांना आणखी चांगला अनुभव यावा यासाठी कंपनी सतत नवनवीन फीचर्स अपडेट करत असते. आज आम्ही तुम्हाला व्हाट्सअपच्या अशाच एका फीचर्सबाबत सांगणार आहोत त्यामाध्यमातून तुम्हाला हव्या त्या व्यक्तींनाच तुमचा DP दाखवू शकता. तुम्हाला प्रश्न पडला असेल कि हे कस शक्य आहे तर ते आज आम्ही तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगतो. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

   

सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर WhatsApp ओपन करा.
व्हाट्सएप उघडल्यानंतर, स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या तीन ठिपक्यांवर टॅप करा आणि सेटिंग्ज पर्याय निवडा.
सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर, ‘Account’ पर्यायावर टॅप करा.
‘Account’ पर्यायामध्ये, ‘Privacy’ वर टॅप करा.
Privacyसेटिंग्जमध्ये, ‘Profile Photo” पर्यायावर टॅप करा.
‘Profile Photo’ पर्यायावर टॅप केल्यानंतर, तुम्हाला तीन पर्याय दिसतील: Everyone’, ‘My Contacts’, आणि ‘My Contacts Except…..
यातील तिसरा पर्याय निवडा, ‘My Contacts Except…’.
आता तुम्ही ते संपर्क निवडू शकता ज्यांच्यापासून तुम्हाला तुमचा DP लपवायचा आहे. त्या सर्व संपर्कांवर खूण करा आणि वरच्या उजव्या कोपर्यात टिक चिन्हावर टॅप करा.
संपर्क निवडल्यानंतर, तुमची सेटिंग्ज आपोआप सेव्ह होतील आणि निवडलेले कॉन्टॅक्ट तुमचा DP पाहू शकणार नाहीत.

आजकाल अनेकांना सुरक्षेतीचे कारणामुळे आपला प्रोफाइल फोटो सर्वांसोबत शेअर करणे धोक्याचे वाटत. अशावेळी व्हाट्सअपचे हे फिचर नक्कीच गरजेचं आणि उपयुक्त मानलं जातेय. तसेच,आपण इच्छित असल्यास, आपण निवडलेल्या संपर्कांमधून आपला डीपी जतन करू शकता. व्हाट्सअपच्या या नव्या फीचर्समुळे आपली सिक्युरिटी आणखी मजबूत होण्यास मदत होईल हे नक्की….